You are currently viewing दु:ख आपले आपण गिळावे

दु:ख आपले आपण गिळावे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी विनायक जोशी यांची अप्रतिम काव्यरचना*

# *दु:ख आपले आपण गिळावे* #

सुख आपले भांडवल असावे
दु:खा आपण कां कुरवाळावे
म्हणती त्याला प्रारब्ध आपले
प्रसाद देवाचा म्हणून जपावे
//१//
भार दु:खाचा सोसून आपण
जखमेचे भांडवल *न* करावे
संसाराचे बुद्धीबळ पटावरचे
प्रत्येक मोहरे आपण वाचवावे
//२//
विषमतेच्या अशा *लढाईत*
मरतो *वजीर* कधी आपला
संसार सुख आधी वाचवताना
दु:ख करण्याला वेळ कोठला
//३//
लेकरे बाळे आपली आपणा
कोलमडून पडता आधार एक
दु:ख आपण *कोळून* प्यावे
घरा घरांतील गोष्ट सामायिक
//४//
नियती हसते विचकुनी दात
तीजला यातील कसे कळावे
समस्यांची बांधून सुंदर मोट
दु:ख आपले आपण गिळावे
//५//

विनायक जोशी🥳 ठाणे
मीलनध्वनी:९३२४३२४१५७
३२०/बुधवार/२४ आॅगष्ट २२

प्रतिक्रिया व्यक्त करा