You are currently viewing कणकवलीत गणेशोत्सवाची तयारीसाठी वाहन पार्किंग व भाजी,फळ विक्रेते यांच्या बैठक व्यवस्थेची नगराध्यक्ष समीर नलावडेंकडुन  पाहणी

कणकवलीत गणेशोत्सवाची तयारीसाठी वाहन पार्किंग व भाजी,फळ विक्रेते यांच्या बैठक व्यवस्थेची नगराध्यक्ष समीर नलावडेंकडुन  पाहणी

काही स्टाँल हटविण्याचे आदेश

कणकवली 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायतने शहरात वाहतूक कोंडी रोखण्यासाठी विशेष नियोजन केले जात आहे.चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी भाजी,फळ,फुल विक्रेत्यांची बैठक व्यवस्था उड्डाण पुलाखाली निश्चित करण्यात आली आहे.स्वतः नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी नगरपंचायत प्रशासनाला सोबत घेऊन पाहणी केली.यावेळी काही स्टाँल हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यावेळी बांधकाम सभापती विराज भोसले,पोलीस उपनिरीक्षक बापू खरात वाहतूक पोलीस चंद्रकांत माने ,माजी नगरसेवक किशोर राणे,जावेद शेख, नगरपंचायत प्रशासनाचे
विनोद सावंत,स्थानिक फळे, फुले, भाजी मार्केटचे अध्यक्ष दादा पावसकर , प्रशांत राणे, सतीश कांबळे, रवी महाडेश्वर , प्रदीप गायकवाड ध्वजा उचले, संजय राणे व नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते

कणकवली शहरातील रस्त्यावर दुकाने थाटणाऱ्या भाजी विक्रेते व फळ विक्रेते हातगाडी यांना ब्रिज खाली बसण्याची जागा निश्चित नगराध्यक्ष व प्रशासनाने केली.त्याचबरोबर आगामी गणेश चतुर्थी काळात मोठ्या प्रमाणात चाकरमानी येतात,त्यांच्या वाहतूक समस्या निवारणासाठी नियोजन करण्यात आले. तसेच पटवर्धन चौक येथे स्टेज उभारून चक्रमान्यांचे स्वागत करण्याचे ठिकाण निश्चित करण्यात आले. यावेळी स्वतः नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कणकवली पटवर्धन चौक ते स्टेट बँक पर्यंत खाली असणाऱ्या दुचाकी, टेम्पो ट्रक, रिक्षा व इतर वाहनांना देखील वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा पद्धतीने पार्किंग लावण्याच्या सूचना केल्या.

तसेच फळ व भाजी विक्रेते यांना आपली दुकाने रस्त्याच्या बाजूने लावताना रस्त्यावर लावू नये.तसेच जर दुकाने रस्त्यावर लावल्यास कारवाई केली जाईल,असा इशारा देत पत्रे लावण्याचा इशारा उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा