You are currently viewing सिंधुदुर्गात २५ ते २८ मे दरम्यान शिवसंपर्क अभियान : २६ रोजी कुडाळात मेळावा

सिंधुदुर्गात २५ ते २८ मे दरम्यान शिवसंपर्क अभियान : २६ रोजी कुडाळात मेळावा

खा. अनिल देसाई यांची प्रमुख उपस्थिती ; आ. वैभव नाईक यांची माहिती

सिंधुदुर्ग :

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथे शिवसंपर्क अभियानाच्या पार्श्वभूमीवर भव्य मेळावा घेतल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसंपर्क अभियान राबविले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ ते २८ मे या कालावधीत हे अभियान राबविले जाणार आहे. याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसंपर्क अभियान प्रमुख, खासदार अनिल देसाई यांची प्रमुख उपस्थिती असणार असून कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचा मेळावा २६ मे रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ शहरातील सिद्धिविनायक हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत, पालकमंत्री ना. उदय सामंत, माजी राज्यमंत्री आ. दीपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष समन्वयक प्रदीप बोरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, कोकण पर्यटन विकास समिती उपाध्यक्ष संदेश पारकर, शिवसेना नेते सतीश सावंत, अतुल रावराणे, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, सुशांत नाईक उपस्थित राहणार आहेत.

शिवसंपर्क अभियानांतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघनिहाय बैठका घेतल्या जाणार आहेत. त्याचबरोबर गावभेट व बैठका होणार आहेत याप्रसंगी शिवसेना पक्ष संघटनेच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच शिवसेना संघटना वाढीसंदर्भात शिवसैनिकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी कुडाळ येथील मेळाव्याला शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व शिवसैनिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा