You are currently viewing रेंजर्स असोशिएशन कोल्हापूरची बैठक सावंतवाडी वनविभागात पार पडली..

रेंजर्स असोशिएशन कोल्हापूरची बैठक सावंतवाडी वनविभागात पार पडली..

सावंतवाडी :

कोल्हापूर वनवृत्ताअंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, सातारा, सांगली रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी यांची बैठक रेंजर्स असोशिएशन कोल्हापूर शाखेच्या वतीने आज वनविभाग सावंतवाडी येथे घेण्यात आली.

वनविभागाच्या क्षेत्रीय अधिकारी/कर्मचारी यांना मोठ्या संख्येने रिक्त असणाऱ्या वनपाल, वनरक्षक, लेखापाल,लिपिक इ. पदे व त्यामुळे क्षेत्रीय तसेच कार्यालयीन कामकाज करताना भेडसावणाऱ्या विविध अडचणींवर चर्चा करणेत आली.

सर्वच पाचही जिल्ह्यातील वनविभागामध्ये क्षेत्रीय अधिकारी/कर्मचारी यांच्या विविध समस्यांबाबत सखोल चर्चा करून त्याबाबत योग्य तोडगा काढणेकरिता मुख्य वन संरक्षक कोल्हापूर यांना अवगत करणेबाबत एकमत झाले.

दरम्यान बुलढाणा येथील आमदार मा. श्री. संजय गायकवाड यांनी वनविभागाच्या अधिकारी कर्मचारी यांचे विरोधात असंवैधानिक भाषा वापरलेननंतर लगेचच वनक्षेत्रात अपप्रवेश करणाऱ्या मेंढपाळांनी तेथील शासकीय कर्तव्यावर असणाऱ्या दोन वनमजुरांवर प्राणघातक हल्ला केलेने सदर घटनेचा असोशिएशन च्या वतीने निषेध नोंदविण्यात आला.

तसेच, नूतन मुख्य वनसंरक्षक वनवृत्त कोल्हापूर श्री. आर. एम. रामानुजम यांनी देशाच्या स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट 2022 रोजी वनवृत्तामध्ये वन, वन्यजीव संरक्षण व संवर्धनाबाबत उत्कृष्ठ कामकरणाऱ्या क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी यांना प्रोत्साहनपर प्रशस्तीपत्र देऊन गॊरविल्याबद्दल एकमताने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त विभागीय वनाधिकारी श्री दीपक शिरोडकर, रेंजर्स असोशिएशन कोल्हापूर चे अध्यक्ष श्री नंदकुमार नलावडे, सचिव श्री अरविंद कांबळे, तसेच कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष अमृत शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 1 =