You are currently viewing “शिव शंकरा”

“शिव शंकरा”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गायक संगीतकार श्री.अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

*”शिव शंकरा”*

शंभो शंकरा शिव भोलेनाथा विश्वेश्वरा
नमितो आम्ही करूणासिंधू भव दुःखहरा।।ध्रु।।

भागीरथी गंगा जटेत सामावणारा
नृत्य कला संगीत दाता तू नटेश्वरा
विश्वशांती दाता कल्याण करणारा।।1।।

सागर विष प्राशुनी अमृत देणारा
असूर मर्दिनी भार्या शोभे गौरीहरा
शोभती गणेश कार्तिकेय सूत शंकरा।।2।।

निळकंठ भस्म विलेप गळा सर्प धरा
कंठी रुद्रमाळ डमरूधर त्रिशुल करा
सकळ रक्षिता इच्छा पूर्ण करणारा।।3।।

बारा ज्योतिर्लिंग दाविती ऊर्जा साक्षात्कारा
शिव शोभती गुरू नवनाथ ज्ञानेश्वरा
शंकराचार्य वसले शांती धर्म प्रसारा।।4।।

श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.
Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा