सलग दुसऱ्या दिवशी विधानसभेत मांडला प्रश्न
कोकणातील हजारो शेतकऱ्यांना भात खरेदी बोनस रकमेची प्रतीक्षा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय भात खरेदी केंद्रावर भात खरेदी केल्यानंतर त्यावर देण्यात येणारा बोनस अद्याप जाहीर केलेला नसल्याने या मुद्द्यावरून आमदार वैभव नाईक यांनी सलग दुसऱ्या दिवशी विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली. काल या मुद्द्यावरून आमदार वैभव नाईक यांनी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला प्रश्न विचारला होता. मात्र त्यावर कोणतेही सकारात्मक उत्तर मिळाले नव्हते. दरम्यान आज विधानसभेत धान खरेदी मुद्द्यावर चर्चा सुरू असताना या दरम्यानच आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्गासह कोकणातील शेतकऱ्यांनी शासकीय भात खरेदी केंद्रात भात देऊन देखील त्याची बोनस रक्कम अद्याप जाहीर केली नसल्याबाबत लक्ष वेधले. आमदार वैभव नाईक यांनी सलग दुसऱ्या दिवशी या मुद्द्यावरून विधानसभेत आवाज उठवला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी शासकीय भात खरेदी केंद्रावर भात विक्री केली होती. मात्र यावर्षी शेतकऱ्यांना बोनस रक्कम जाहीर झाली नव्हती. याबाबत आमदार वैभव नाईक यांनी यापूर्वी देखील अनेकदा आवाज उठवला होता. दरम्यान काल सोमवारी व आज मंगळवारी सलग दोन दिवस कोकणातील भात शेतकऱ्यांना बोनस जाहीर करण्याचा मुद्दा आमदार वैभव नाईक यांनी विधानसभेत लावून धरला. या प्रश्नी आता सरकार काय निर्णय घेते त्याकडे कोकणातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.