You are currently viewing वझरे येथे नियमबाह्य कोळसा वाहतूक; जिल्हाधिकार्‍यांना निवेदन..

वझरे येथे नियमबाह्य कोळसा वाहतूक; जिल्हाधिकार्‍यांना निवेदन..

दोडामार्ग :

 

वझरे येथील ग्लोबल कोक कंपनीत नियमबाह्य कोळसा वाहतूक करणारे डंपर यांनी गोवा येथून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करताना त्यांची रेपिड टेस्ट करणे बंधनकारक आहे. असे असताना येथून राञीच्या वेळी ही वाहतूक होत असते. आरोग्य कल्याण समिती सदस्य यांनी आयी चेक पोस्ट येथे राञीच्या वेळी बेकायदा कोळसा वाहतूक करणारे १५ डंपर पकडले. यावेळी ड्युटीवर असलेल्या कर्मचारी समक्ष पंचयादी करून देखील हे डंपर कसे काय सोडण्यात आले याची चौकशी व्हावी. तसेच या कंपनीत डंपर चालक कोरोना पाॅझिटीव्ह असताना हे डंपर सोडले. याचा तपास करावा असे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती सौ. अनिशा शैलेश दळवी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदन केले आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोडामार्ग गोवा सीमेवर आयी चेक पोस्ट या ठिकाणी दिनांक ०६/०५/२०२१ रोजी आयी गावात महाराष्ट्र गोवा सीमेवर असलेल्या तपासणी नाक्यावर गावातील काही ग्रामस्थांच्या सततच्या येणाऱ्या तोंडी तक्रारींच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी दोडामार्ग तालुकाअध्यक्ष श्री.प्रविण गवस व दोडामार्ग पंचायत समिती सदस्य श्री.लक्ष्मण उर्फ बाळा नाईक यांनी रात्रौ ११.०० वाजता मोरगांव प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्ण कल्याण समितीचे सदस्य या नात्याने भेट देवून पाहणी केली. या तपासणी नाक्यावर भेट देण्याअगोदर रात्री ८.४५ गोवा येथून आलेले साधारणपणे १५ ते २० डंपर तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांना न जुमानता किंवा या तपासणी नाक्यावर कोविड १९ काळात आरोग्य तपासणीच्या हेतूने दोडामार्गचे तहसीलदार तथा Incident Commander आपत्ती व्यवस्थापन दोडामार्गचे प्रमुख यांनी दिलेले कोणतेही आदेश न पाळता महाराष्ट्र राज्याच्या सिमेत थेट प्रवेश करीत असल्याचे व्हिडिओ आम्ही मा.तहसीलदार व मा.पोलिस निरीक्षक दोडामार्ग यांना पाठवून मा.उपविभागीय पोलिस अधिकारी सावंतवाडी यांना माहीतीसाठी मोबाईलद्वारे सूचीत केले होते.

आपत्ती व्यवस्थापनच्या दृष्टीने प्रशासनाने सदर बाबी गाभिर्याने घेणे गरजेचे होते. अशा अनधिकृतपणे प्रवेश केलेल्या वाहनांवर कारवाई करणे गरजेचे होते, मात्र तसे झाले नाही. यावेळी आढळून आलेल्या बाबी खालील प्रमाणे सदर तपासणी नाक्यावरील असलेल्या एका रजिस्टरवर १७ गाड्यांनी प्रवेश केलेबाबत नोद आढळून आली. मात्र त्यांच्या चालकांची कोणत्याही प्रकारची आरोग्य विषयक माहिती आढळून आली नाही. तशा प्रकारची पंचयादी करण्यात आलेली आहे. यावेळी उपशिक्षक श्री.रामकृष्ण वासुदेव गवस व होमगार्ड इतकेच कर्मचारी तपासणी नाक्यावर ड्युटी बजावत उपस्थित होते. संबंधित शिक्षक व होमगार्ड यांनी तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशातील नियमांचे पालन करीत परराज्यातुन सीमा नाक्यावरुन ये जा करणारी व आदेशातील नियमअटी पूर्ण न करणारी सर्व वाहाने अडवून ठेवली होती. तशा सूचना त्यांनी वरीष्ठांना दिल्या होत्या. मात्र सकाळी ७.३० वाजता सदर वाहने सोडून देण्यात आली. त्यामुळे यातील दोषींवर कारवाई करण्यात यावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 5 =