You are currently viewing जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी वैभव दातार लिखित अप्रतिम काव्यरचना

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी वैभव दातार लिखित अप्रतिम काव्यरचना

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी वैभव दातार लिखित अप्रतिम काव्यरचना

आज 23 ऑगस्ट म्हणजेच जागतिक वडापाव दिन
‘वडापाव’ हा सगळ्यांचा अतिशय आवडीचा खाद्यपदार्थ आहे. वडापाव न आणणारा माणूस अगदी विरळाच. अशाच ह्या वडापावाचे एकमेकांशी असलेले नाते मी गंमतशीर कवितेत मांडले आहे. सर्व वडापाव प्रेमींकरिता ही खास कविता…

कढईतील वडा पावाला म्हणाला खुशीत
दोन्ही हात उघड अन् घे मला कुशीत

तेलाची झाली मला आंघोळ कर मला कोरडे
मऊमऊ तुझ्या हातांमध्ये रहायला मला आवडे

लाल हिरव्या चटणीची सुंदर नक्षी हातावर
बटर आणि चीज यांचा पातळ थर तयावर

पाव म्हणे वड्याला मिसळ माझी बहिण
प्रीय आहेस मला तू जरी पावभाजी मैत्रीण

पिझ्झा बर्गर फ्रेंच फ्राईज् चा जरी आहे जमाना
तरीदेखील आपली जोडी खूप आवडे लोकांना

लहानथोर सर्व माणसे खाती आपल्याला चवीने
म्हणती खाद्यविश्व गाजविले वडापाव जोडीने

जन्मोजन्मीचे नाते आपले एकमेका साथ देऊ
भूक भागवून खवय्यांची सर्वांना खाद्यानंद देऊ

©वैभव दातार, कल्याण
भ्रमणध्वनी :८८९८४८२३८२

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + eighteen =