छत्रपती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम, 35 रक्तदात्यांनी केले रक्तदान
ओरोस :
रानबांबुळी येथील छत्रपती युवा प्रतिष्ठान नेहमी समाजोपयोगी उपक्रम राबवत असते.गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर रस्ते अपघातांची मालिका सुरू होते आणि जिल्हा रुग्णालयाला रक्ताची गरज भासते. ही गरज लक्षात घेऊन छत्रपती युवा प्रतिष्ठानने आज रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. निमित्त होते रानबांबुळी रवळनाथ मंदिराचा वर्धापन दिन, धार्मिक कार्यक्रमाच्या औचित्यावर अश्या समाज उपयोगी उमक्रमाचे यशस्वी आयोजन करण्याच्या कृतीचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
या रक्तदान शिबिरात युवकांसोबत, युवती आणि महिलांनी सुद्धा भाग घेत 35 बॉटल रक्त जिल्हा रुग्णालय रक्तपेढीकडे सुपूर्द केले.
यावेळी गावातील जेष्ठ नागरिक बाबुराव परब, परशुराम परब, सरपंच वसंत बांबूळकर, उपसरपंच सतीश परब, डॉ. वैभव आईर, भाई गावडे, प्रभाकर सावंत, संजय लाड, पोलिस पाटील, श्री. प्रकाश मुणगेकर, संदीप परब हे मान्यवर तसेच
महिला मंडळाच्या साक्षी गोसावी, दिशा ठाकूर याही उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे सिंधू रक्तमित्र प्रतिषठान चे अध्यक्ष श्री.प्रकाश तेंडोलकर उपस्थित राहून रक्तदान, अवयदान याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी मंडळाचे पदाधिकारी शुभम परब, प्रसाद गावडे, अक्षय परब, अमेय खंदारे, वैभव परब, अमोल ठाकूर, भास्कर मराठे, प्रज्योत गावडे, सर्वेश परब, आशिष परब आणि सहकारी मंडळींनी शिबीर यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.
प्रतिषठानच्या वतीने नेहमीच स्वच्छता, पर्यावरण, शिक्षण आणि आरोग्य अश्या अनेक विषयासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबवित असते. अल्पावधीतच या प्रतिष्ठानने गावात आपल्या सामाजिक कामाचा ठसा उमटवला आहे.