वेंगुर्ला
वेंगुर्ला येथील इर्शाद शेख फाऊंडेशन व वेंगुर्ला शहर काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शस्त्रक्रिया नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालय येथे झालेल्या या शिबिराचे उद्घाटन इर्शाद शेख यांच्या हस्ते झाले. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश डिचोलकर, तालुकाध्यक्ष विधाता सावंत, माजी नगरसेविका कृतिका कुबल, सुमन निकम, आसद मकानदार, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नाली पवार-माने, डॉ.गृहिता राव, परिचारिका विनिता तांडेल, पब्लिक रिलेशन ऑफिसर धुमाळ आदी उपस्थित होते.
डेरवण येथील विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट भ.क.ल.वालावलकर रुग्णालयात रोग निदान व संशोधन केंद्र डेवरण रुग्णालयाचे सर्जन डॉ.शिदे, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ.इंगळे, कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ.गुरजीत चड्डा, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.देवकर, जनरल मेडिसीन तज्ज्ञ डॉ.घांगुर्डे, डॉ.जाधव आदींनी रुग्णांची तपासणी केली. शस्त्रक्रियेची गरज असलेल्या पिवळ्या व केसरी रेशनकार्ड धारकांची शस्त्रक्रिया सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात डेरवण येथे मोफत करण्यात येणार असल्याची माहिती इर्शाद शेख यांनी दिली.