You are currently viewing “महालक्ष्मी तथास्तु”

“महालक्ष्मी तथास्तु”

*महालक्ष्मी परिवाराच्या नवीन दालनाचे उद्घाटन थाटात संपन्न*

 

सावंतवाडी :

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला “वन स्टॉप शॉप” अशी संकल्पना सत्यात उतरवत सावंतवाडीच्या सुंदर नगरीत विनायक कोडल्याळ आणि महालक्ष्मी परिवाराच्या “महालक्ष्मी तथास्तु” या नव्या शॉपिंग दालनाचे उद्घाटन श्री.विक्रम उर्फ मेघ:श्याम श्रीपाद भांगले, विधिज्ञ दिल्ली उच्च न्यायालय तथा मानद सचिव राइफल असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. उद्घाटन सोहळ्याच्या शुभारंभी मान्यवर पाहुण्यांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे प्रामुख्याने श्री.प्रशांत पानवेकर, प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सावंतवाडी, डॉ.रोहिणी सोळंके, पोलीस उपअधीक्षक सावंतवाडी, श्री शंकर महादेव कोरे, पोलीस निरीक्षक सावंतवाडी, श्री.अमोल माने, मुख्य प्रबंधक स्टेट बँक ऑफ इंडिया सावंतवाडी, श्री संतोष नाईक, ह्यूमन राइट्स कोकण विभागीय अध्यक्ष, श्री.प्रवीणभाई भोसले, माजी राज्यमंत्री, दुय्यम निबंधक, सावंतवाडी आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे महालक्ष्मी परिवारातर्फे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन स्वागत करण्यात आले.

सावंतवाडी येथे महालक्ष्मी परिवाराने सुरू केलेल्या “महालक्ष्मी तथास्तु” गारमेंट्स अँड अँपरल्सला उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आणि शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कोडल्याळ कुटुंबियांचे तोंड भरून कौतुक केले. बावीस वर्षांपूर्वी गडहिंग्लज येथून सावंतवाडीत आलेल्या कोडल्याळ कुटुंबीयांनी महालक्ष्मी शूज, महालक्ष्मी सुपर बाजार नंतर महालक्ष्मी तथास्तु हे नवे दालन सुरू सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिले सर्व सामान एकाच छताखाली मिळण्याचे ठिकाण सुरू केल्याने सर्व मान्यवरांनी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी कोडल्याळ कुटुंबियांनी घेतलेली यशस्वी गरुडझेप हे त्यांच्या कष्टाचे, श्रमाचे फळ असल्याचे सांगून सिंधुदुर्ग वासीयांनी उत्तमोत्तम सेवा मिळण्याची आशा व्यक्त केली. साहित्यिक दीपक पटेकर यांनी विनायक कोडल्याळ यांनी व्यवसायात केलेल्या प्रगती बद्दल गौरवोद्गार काढत, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिला “वन स्टॉप शॉप” म्हणजे मिनी मॉल सुरू करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना गोवा, कोल्हापूर, बेळगांव येथे न जाता सावंतवाडीतच सर्व साहित्य उपलब्ध करून दिल्याचे सांगत कोडल्याळ कुटुंबाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

सावंतवाडीच्या सुंदर नगरीत नव्याने सुरू झालेल्या “महालक्ष्मी तथास्तु” गारमेंट्स अँड ऍपरल्स मध्ये सर्वसामान्य लोकांपासून उच्चवर्गीय लोकांसाठी सर्वप्रकारच्या ब्रँडेड वस्तू, गृहपयोगी साहित्य, लहान मुलांचे कपडे, शूज, खेळणी, गाड्या, स्त्रियांसाठी सर्वप्रकारचे कपडे, साड्या, ड्रेस मटेरियल, कुर्ते, शूज, सँडल्स त्याचप्रमाणे पुरुषांसाठी सर्व प्रकारचे कपडे, शूज, चप्पल्स, लग्न समारंभासाठी कपडे, ब्लेझर्स, कुर्ते, शालू, आभूषणे, आदी सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे. सावंतवाडीत सुरू झालेल्या महालक्ष्मी तथास्तु मध्ये सर्वांनी एकदा भेट देऊन आपल्या सेवेची संधी द्यावी असे आवाहन महालक्ष्मी परिवारातर्फे करण्यात आले आहे.

महालक्ष्मी तथास्तुच्या उद्घाटन प्रसंगी रिक्षा युनियनचे सुधीर पराडकर, व्यापारी प्रसन्ना शिरोडकर, साहित्यिक दीपक पटेकर,श्री.कांता कोडल्याळ, श्री.अरुण गायकवाड, आशिष गायकवाड, सौ.छाया गायकवाड, सौ.रंजना कांता कोडल्याळ, विनायक कोडल्याळ, राम कोडल्याळ, सौ.दीपाली कोडल्याळ, सौ.वर्षा कोडल्याळ, ऋषिकेश, आदित्य आदिनाथ, श्रुती, आर्वी, अवधूत कोडल्याळ, श्री.विनायक मसुरकर, आदी महालक्ष्मी परिवाराचे हितचिंतक, मित्रमंडळी, सावंतवाडी वासीयांसह प्रिंट मीडिया आणि सोशल मीडियाचे पत्रकार उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − three =