You are currently viewing आजगाव साहित्य प्रेरणा कट्ट्याची बाविसावी सभा रविवा

आजगाव साहित्य प्रेरणा कट्ट्याची बाविसावी सभा रविवा

 

आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याची बाविसावी मासिक सभा रविवार दिनांक २१ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी पाच वाजता आजगाव वाचनालयात आयोजित केली आहे. या सभेत ‘काव्यभोवताल’ या कार्यक्रमा अंतर्गत कवी विनय सौदागर त्यांच्या मालवणी कवितेच्या प्रवासा बद्दल बोलतील.
विनय सौदागर यांचे ‘भोवताल’ व ‘सभोवताल’ हे दोन मालवणी काव्यसंग्रह प्रकाशित असून या कार्यक्रमात त्यातील काही कविता ते सादर करतील; तसेच या कवितांचा प्रवासही उलगडून दाखवतील. त्यांनी सुमारे पाचशे मालवणी चारोळ्या लिहिल्या असून त्यापैकी तीनशे चारोळ्या स्थानिक दैनिकातून प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याविषयी,तसेच मालवणी हायकू (मायकू) विषयीही ते बोलतील.
तरी याचा आस्वाद घेण्यासाठी आणि त्याविषयी चर्चा करणेसाठी या सभेस सर्व साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन साहित्य कट्ट्यातर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − fifteen =