कुडाळ :
सावंतवाडी येथील सिंधू रनर्स आयोजित ‘सावंतवाडी १२ तास रन’ या धावण्याच्या उपक्रमांतरतील सहभागी धावपटूंना कुडाळ येथील बॅ. नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या प्राध्यापक विद्यार्थ्यांनी आरोग्य सेवा दिली.
धावणे या व्यायाम प्रकाराबद्दल जनजागृती करावी व जिल्ह्यातील जिल्ह्यात राज्यात देशात नेतृत्व करणारे धावपटू तयार व्हावे. हे उद्दिष्ट समोर ठेवून सिंधू रनर्स आयोजित, ‘सावंतवाडी 12 तास रन’ या उपक्रमातील सहभागी रनर्सना कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या फिजिओ डॉ. शरावती शेट्टी व प्राचार्य डॉ. सुरज शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली दिशा कांगडे, प्रथम फुटक, वृषाली आरेकर, पूजा गावडे, मृण्मयी खानोलकर व स्नेहल गोरूले यांच्या पथकाने रनर्सना दुखापती वर इलाज करणे, त्यांचं शारीरिक पुनर्वसन करणे इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, देखभाल करणे आणि त्यांच्या पायांना होणारा त्रास दूर करणे अशी मैदानावर ची भौतिकोपचार सेवेची जबाबदारी पार पाडली व धावपटूना फार मोठे सहकार्य केलंं. त्यांच्या या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून कौतुक अभिनंदन केले जात आहे.