You are currently viewing स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये गोकुळाष्टमीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये गोकुळाष्टमीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा

सावंतवाडी

आज दि. १८ ऑगस्ट २०२२, गुरुवार रोजी स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये गोकुळाष्टमीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला गेला. शाळेचे संचालक आदरणीय श्री. रुजूल पाटणकर व सौ. काश्मिरा पाटणकर तसेच, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रथम विद्यार्थ्यांना अनुक्रमे इंग्रजी व मराठी भाषेत गोपाळकाला म्हणजे काय?, तसेच जन्माष्टमी व दहीहंडी यांचे महत्त्व व त्याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. इ. २ री व ३ रीच्या विद्यार्थ्यांनी गोकुळाष्टमीवर आधारित गीत सादर केले. तसेच, इ. १ ली, ३ री व ४ थी च्या विद्यार्थ्यांनी दहीहंडीची प्रथा कशी सुरु झाली? हे नाट्य प्रदर्शनाद्वारे प्रदर्शित केले. तर, इ. १ ली व २ री च्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी या सणावर आधारित नृत्य सादर केले. त्याचप्रमाणे, इ. ३ री व ४ थी च्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम केला. या उत्सवात सर्व विद्यार्थी, उपस्थित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, मदतनीस आनंदाने सहभागी झाले. व शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. अशाप्रकारे मोठ्या जल्लोषात व उत्साहात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा