सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष अडचणीत असतानाच आपले स्नेही आणि पवार घराण्याशी जवळीक असलेले संदीप घारे आणि राष्ट्रवादीच्या पुण्यातील नेत्या अर्चना घारे यांच्या कार्याने प्रेरित होत पुंडलिक दळवी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादीला पुन्हा जुने ऐश्वर्याचे दिवस आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले.
सर्वसामान्य कुटुंबातील असलेले पुंडलिक दळवी महाविद्यालयात असल्यापासूनच समाजकार्यात स्वतःला झोकून देऊन कार्य करत आहेत. स्वतःला कोणतेही पद मिळो न मिळो परंतु आपल्या राजकीय वाटचालीचा फायदा सर्वसामान्य, गोरगरिबांना झाला पाहिजे असे स्वप्न उराशी बाळगून पुंडलिक दळवी अर्चना फौंडेशन च्या माध्यमातून समाजकार्य सुद्धा सुरू ठेवले आहे. गोरगरिबांच्या संकटात कित्येकांना त्यांनी मदतीचा हात दिला होता. त्यामुळे पुंडलिक दळवी हे केवळ व्यापारी म्हणून ओळखले न जाता खऱ्या अर्थाने समाज कार्यकर्ते म्हणून लोकांच्या जवळचे बनले आहेत.
पुंडलिक दळवी यांनी आपली मधुर वाणी आणि माणसे जोडण्याच्या कलेने अनेक लोकांशी मित्रत्वाचे आणि प्रेमाचे संबंध जोडले आहेत. राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही, आपली दूरदृष्टी आणि काम करण्याची आवड यामुळे ते सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिले. त्यांच्या कार्यावर प्रेरित होऊन पक्षाने त्यांच्यावर व्यापारी सेलच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली होती. दळवी यांनी सुद्धा मिळालेल्या संधीचे सोने करत जिल्हा व्यापाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवीत व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास हिरहिरीने सुरुवात केली. गोरगरीबांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचे प्रामाणिक प्रयत्न सुरू असतात. त्यामुळे अनेक लोकांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी सदैव असल्याचे दिसून येतात. पक्षासाठी झोकून देऊन काम करण्याची त्यांची वृत्ती आणि कार्यपद्धती यामुळे पक्षात त्यांचा आदर वाढला. भविष्यात सावंतवाडी नगरपलिकेतील राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष पदासाठी दळवी यांचेच नाव आघाडीवर असेल.
पुंडलिक दळवी यांचा जनसंपर्क आणि समाजकार्य पाहता येत्या काळात राष्ट्रवादीकडून नक्कीच त्यांना विविध पदे मानसन्मान मिळेलच यात शंकाच नाही, उज्वल भविष्यासाठीच राष्ट्रवादीच्या या युवा शिलेदाराला *संवाद मिडियाकडून भावी राजकीय वाटचालीसाठी आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…💐💐*