You are currently viewing व्ही.एन.नाबर स्कूलमध्ये “एमएसएफसी” सारखा उपक्रम अतिशय स्तुत्य…

व्ही.एन.नाबर स्कूलमध्ये “एमएसएफसी” सारखा उपक्रम अतिशय स्तुत्य…

आठवीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत…

बांदा

बांद्या सारख्या ग्रामीण भागात व्ही.एन.नाबर इग्लिश मिडीयम स्कूल मध्ये एम.एस.एफ.सी सारखा तंत्र विषय आठवी ते दहावी मधील मुलांना शिकवण्यात येत आहे. शाळेचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे प्रतिपादन भाजप तालुका कार्यकारणी सदस्य श्री. संतोष सावंत यांनी एस एस.एफ,सी, विभागाच्या आठवीतील विद्यार्थ्यांच्या स्वागत कार्यक्रमात बोलताना केले.
संपुर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही निवडक शाळेत हा तंत्रज्ञान विषय शिकवला जातो. या व्ही.एन.नाबर शाळेतील विद्यार्थी खरचं भाग्यवान आहेत की या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय जीवनात तंत्रज्ञान सारखा विषय शिक्षणात मिळत आहे. इंजिनिअरिंग, आय.टी.आय, हाँटेल मँनेजमेंट,सारख्या महाविद्यालयात प्रवेश घेताना या विषयाचा विद्यार्थ्यांना खूप उपयोग होत आहे.
एन.एस.क्यु,एफ,सारखे तंत्रशिक्षणाचे अभियान संपूर्ण देशात मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केले आहे.या विषयाचे विद्यार्थ्यांनी ज्ञान आत्मसात केले पाहिजे असे मत भाजप तालुका उपाध्यक्ष, बांदा मंडल श्री.सिद्वेश पावसकर यांनी व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर माजी सभापती शीतल राऊळ, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ.श्वेता कोरगावकर,भाजपा तालुका उपाध्यक्ष बांदा मंडल सिद्धेश पावसकर,भाजपा तालुका कार्यकारिणी सदस्य संतोष सावंत
भाजपा सोशल मीडिया हेड सावंतवाडी तालुका बाबा काणेकर, भाजपा तालुका मंडल सदस्य आबा धारगळकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई, विभाग प्रमुख सौ.रिना मोरजकर, उपस्थित होते.
आजच्या स्पर्धेच्या युगात नुसते पुस्तकी शिक्षण न घेता आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळणारे एस.एस.एफ.सी. सारखे विषय विद्यार्थ्यांनी घेतले पाहिजेत आणि हे शिक्षण आज काळाची गरज बनली आहे असे मत मनोगतातुन बोलताना माजी सभापती शीतल राऊळ यांनी केले.
आजपासून आठवी मधील मुलांना हा विषय शिकण्यास मिळणार आहे. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान विषय शिकण्याची सुवर्णसंधी मिळाली असल्याचे मत यावेळी माजी जि.प.सदस्या सौ.श्वेता कोरगावकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनातून व्यक्त केले. तसेच या विषयामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले व शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी मुलांना भेट वस्तू व गोड खाऊ वाटप करुन मुलांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ.रिया देसाई, श्री.भिकाजी गिरप, यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई, सुत्रसंचालन समन्वयक श्री. राकेश परब यांनी तर आभार शेवटी सौ.गायत्री देसाई यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा