मालवण
तालुक्यातील रस्ते खड्डेमय बनले असून गणेश चतुर्थीपूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविणे गरजेचे आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाला तशा सूचना द्या अशी मागणी मालवण भाजपने तहसीलदार अजय पाटणे यांच्याकडे केली.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, बाबा परब, महेश मांजरेकर, अजिंक्य पाताडे, मोहन कुबल, हरीश गावकर यासह अन्य उपस्थित होते.
तालुक्यात करण्यात आलेल्या रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. गणेश चतुर्थीची लगबग सुरु झाली आहे. घरोघरी गणपतीचे आगमन होणार आहे. मात्र, गणपती आणण्यासाठी तालुक्यातील रस्ते सुस्थितीत आहेत का ? सर्व मुख्य रस्त्यांसह ग्रामीण भागातील रस्त्यांवर खड्डे आहेत. मालवण कसाल रस्त्याची तर दुर्दशा झाली आहे. अशा परिस्थितीत गणपती आणणार कसे ? आपण तालुक्याचे मुख्य अधिकारी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग अधिकाऱ्यांना खड्डे बुजविण्याच्या सूचना द्या. तसेच गणेश चतुर्थी कालावधीत अवजड वाहने बंद करा अशी मागणी अशोक सावंत यांनी तहसीलदार पाटणे यांच्याकडे केली.