You are currently viewing सणवार आणि वनस्पती संवर्धन

सणवार आणि वनस्पती संवर्धन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री श्रीम.हेमांगी देशपांडे लिखित लेख*

 

सणवार हा आता मनुष्याच्या रोजच्या जीवनाचा भाग झाला आहे. किंबहुना मनुष्याचे जीवन आणि सण हे एकमेकांचे अविभाज्य अंग बनले आहे.ही अविभाज्यता कोरोनाच्या काळात सर्वांना प्रकर्षानेजाणवली.सणवारांनी केवळ मनुष्यालाच नव्हे तर निसर्गालाही आपल्या त सहभागी करून घेतले आहे. आपल्या संस्कृतीत विविध सण आहे. प्रत्येक सण हा वेगवेगळ्या देवाच्या नावाने केला जातो. प्रत्येक देवाला वाहिली जाणारी पाने व फुले ही वेगवेगळ्या प्रकारची असते. इतकेच नव्हे तर प्रत्येक सणाला, प्रत्येक देवाला ,विशिष्ट प्रकार च्या झाडाची पाने किंवा फुलं वाहिली जातात. जसे महादेवाला बेलाचे पान, मारुतीला रुईची पाने, गणपतीला दूर्वा व शमीपत्रे, दसऱ्याला आपट्याची पानं सोनं म्हणूनही देतात.
हरतालिकेला वेगवेगळ्या प्रकारची फुलांची व फळांची पाने महादेवाला वाहतात. दर सणाला
आंब्याची पाने तोरण म्हणून लावतात.
पूजेला लागणारी ही फुलं व पानांची रोजची गरज पूर्ण व्हावी म्हणून अशी फुलझाडे घराच्या अंगणात आवर्जून लावली जातात. फ्लॅट संस्कृतीतही कुंड्यांमध्ये छोटी छोटी फुल झाडे लावली जातात. अशा सणांना लागणारी पान व फुलं यांची मागणी अशा सणासुदीच्या काळात जास्त असते. फुलांची ही गरज भागवण्यासाठी फुलांची शेती ही केली जाते. अशा वृक्षवेलींची सहजासहजी वृक्षतोड होत नाही. या वृक्षवेलींचे संरक्षण व संवर्धन केले जाते. वर्षानुवर्षे चालत येणाऱ्या सणांच्या या परंपरेमुळे आज झाडांच्या अनेक जाती सुरक्षित आहेत. अस्तित्वात आहेत.
ही झाडे केवळ शोभेसाठी नाही, केवळ पूजेसाठीच नाही तर यांचे औषधी उपयोगही आहे.
हाच मानव कल्याणाचा हेतू ठेवून वनस्पतीचे अस्तित्व टिकावे म्हणून आपल्या पूर्वजांनी सणांची व वनस्पतीची सांगड घालण्यासाठी अशा परंपरा तयार केल्या असाव्यात. निसर्गाशी निगडीत सणवार असलेली आपली भारतीय संस्कृती एक प्रकारे निसर्गाची रक्षण करताच झाली आहे.

सौ हेमांगी देशपांडे
चिंच भवन,नागपुर

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + thirteen =