You are currently viewing शिरोडा वेळागर येथील धूप प्रतिबंधक बंधारा गेला वाहून

शिरोडा वेळागर येथील धूप प्रतिबंधक बंधारा गेला वाहून

माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली पाहणी : शासनाकडे बंधाऱ्यासाठी करीन मागणी : दिले आश्वासन

वेंगुर्ले :

तालुक्यातील शिरोडा वेळागर येथे असलेला धूप प्रतिबंधक बंधारा बऱ्याच अंशी वाहून गेला आहे, परिणामी किनाऱ्यावरील नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या बंधाऱ्याची विधान परिषदेचे माजी आमदार परशुराम (जीजी) उपरकर यांनी वेळागर येथे येऊन पाहणी केली, आणि वेळागर संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्या पावसाच्या वेळी समुद्राच्या उधाणाचे पाणी थेट वस्तीत घुसले होते. त्यामुळे किनाऱ्यावरील नागरिकांच्या माड बागायती मध्ये हे खारे पाणी घुसून नुकसान झाले आहे. दरवर्षी हे नुकसान वाढत असून वस्तीलाही धोका निर्माण झाला आहे.
काही वर्षांपूर्वी ज्यावेळी समुद्राचा धोका वस्तीला वाढू लागला त्यावेळी वेळागरवासीयांनी सिमेंटच्या पिशव्यांमध्ये माती भरून किनाऱ्यालगत स्वतः बांधारा उभारला होता. त्यानंतर विधान परिषदेमध्ये परशुराम परकर यांनी आवाज उठवल्यानंतर या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाला चालना मिळाली होती. हा धूप प्रतिबंधक बंधारा सध्या वाहून गेला आहे त्यामुळे शासनाने तात्काळ याकडे लक्ष द्यावा अशी येथील नागरिकांची मागणी आहे.


दरम्यान आता उपरकर यांनी पुन्हा पाहणी करून यापुढे किनाऱ्यावरील नागरिकांची नुकसानी होऊ नये यासाठी मनसे प्रयत्न करेल असे सांगितले. तसेच वेळागर संघर्ष समितीच्या सर्व लढ्यांमध्ये मनसे पाठीशी राहील असा विश्वासही उपरकर यांनी या पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
यावेळी मनविसे माजी जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, वेंगुर्ले तालुका सचिव आबा चिपकर, तालुका उपाधक्ष प्रकाश साठेलकर, सावंतवाडी शहर अध्यक्ष आशिश सुभेदार, सचीव कौस्तुभ नाईक, विभाग अध्यक्ष संदेश शेट्ये, शाखा अध्यक्ष रोहीत म्हाकले आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. तर वेळागर येथील चर्चेच्या वेळी शिरोडा ग्रामपंच्यायत सदस्य तथा संघर्ष समितीचे अध्यक्ष आजू अमरे, सुधिर भगत,मदन अमरे, सुरज अमरे, आनंद अमरे, प्रकाश भगत, संतोष भगत, समिर भगत, अशोक भगत, पास्कोन फर्नाडिस, रुजारियो अल्फान्सो, अमोल, गौराज अमरे, स्वप्नेश भगत,हेनरिक सोज, मेक्सी सोज, संतान फर्नाडिस, दिपा भगत, प्रीती भगत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + two =