You are currently viewing सडूरे येथील जलजीवन मिशन मधून हर घर नळ योजनेसाठी 2365500 रुपये मंजूर

सडूरे येथील जलजीवन मिशन मधून हर घर नळ योजनेसाठी 2365500 रुपये मंजूर

ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांच्या प्रयत्नांना यश

2017 ते 2022 या पाच वर्षाच्या कार्यकाळात रस्ता आणि पाणी प्रश्न मार्गी लावण्यास ग्रामपंचायत कार्यकारणी व प्रशासन यशस्वी

वैभववाडी

ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे येथील प्रभाग क्रमांक एक मेजारीवाडी रावराणेवाडी,तुळशीचे भरड, राणेवाडी, प्रभाग क्रमांक तीन गावठाण वाडीतील कवटीचा व्हाळ, प्रभाग क्रमांक दोन मधील तांबळघाटी नळ योजनेसाठी आवश्यक ते साहित्य पुरवठा करणार आहेत. याआधी बौद्धवाडी येथील नळ योजनेसाठी समाज कल्याण मधून माजी समाज कल्याण सभापती शारदा कांबळे मॅडम यांच्या विशेष प्रयत्नातून व ग्रामस्थांच्या सहकार्यातून विहीर व 14,15 वित्त आयोगातून घरपोच नळ पोचवण्याचे काम पूर्ण झाले आहे. तांबळघाटी नळ योजनेसाठी 8.0 लाख रुपये रूंजूनेसाठी 3.5 लाख १५ वित्त आयोगातून ग्रामपंचायत स्तरावरून नवलराज काळे यांनी विशेष पाठपुरावा करून मंजूर करून कामे सुरू केली आहेत. शिराळामध्ये नैसर्गिक नळ योजना सुरळीत चालू आहे तर शिराळे शेळकेवाडी येथील धनगर वाडीला नवल राज काळे यांच्याच प्रयत्नातून नैसर्गिक स्त्रोतावरून नळ योजना घरपोच झालेली आहे व आता जलजीवन मिशन मधून नळ पाणी योजना मंजुरी साठी आवश्यक तो पाठपुरावा नवलराज काळे संबंधित विभागाकडे करत होते. यामध्ये दोन वेळा टेंडर फ्लॅश करावं लागले त्यात प्रथमता टेंडर फ्लॅश केल्यानंतर काही अडचणींमुळे कॉन्ट्रॅक्टर ने काम न करण्याचा निर्णय घेतला पुन्हा हे टेंडर लागले व ते कॉन्ट्रॅक्टर टेंडर मंजूर देखील झाले. वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर गणपती ते दसऱ्यापर्यंत पावसाचं वातावरण बघून सदर कामाला सुरुवात करणार आहे हे काम पूर्ण झाल्यानंतर गावातील संपूर्ण घरे पाण्याखाली येणार आहेत संपूर्ण घरांना नळ योजना भेटणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या जलजीवन मिशन या योजनेचा व 14,15 वित्त आयोग ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांनी आपल्या गावाला पुरेपूर फायदा करून दिला आहे. या कामाचा पाठपुरावा करत असताना कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे साहेब यांच्या मोलाचं सहकार्य मिळाले असल्यामुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. लवकरात लवकर हे काम सुरू करून प्रभाग क्रमांक एक व इतर वाडीतील जनतेला पाण्याची सुविधा करून देणार असे ग्रामसभेच्या अध्यक्षीय भाषणामध्ये नवलराज काळे यांनी जनतेला सांगितले आहे. हे टेंडर मंजूर करण्याकरिता ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रशांत जाधव साहेब, जल जीवन मिशन च्या कामाचे एस्टिमेट करणारे सर्व इंजिनियर्स पाणीपुरवठा अधिकारी, सहकारी ग्रामपंचायत सदस्य व जनतेचे मोलाचे सहकार्य लाभले त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे साहेब यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे या टेंडर मंजुरीपर्यंत आम्ही पोहोचू शकलो त्यामुळे या सर्वांचे नवलराज काळे यांनी आभार मानले. लवकरात लवकर या कामाचा शुभारंभ करून कामात सुरुवात होईल असे देखील काळे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा