You are currently viewing तळेरे हायस्कूल मध्ये स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने विविध उपक्रम

तळेरे हायस्कूल मध्ये स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने विविध उपक्रम

वामनराव महाडीक विद्यालयात व कनिष्ठ महाविद्यालयात ध्वजारोहन

तळेरे हायस्कूलमध्ये अमृतमहोत्सवी वर्ष विविध उपक्रमांनी साजरे

अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तळेरे हायस्कूलमध्ये भरगच्च कार्यक्रम

वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तळेरे मध्ये स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वार्षानिमित्त विविध उपक्रम घेत स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी ७५ वे वर्ष उत्साहात साजरे करण्यात आले
शाळा समिती सदस्य प्रविण वरूणकर यांचे हस्ते विद्यालयात ध्वजारोहन करून स्वातंत्र्याचा ध्वज डौलाने फडकवण्यात आला .तसेच याप्रसंगी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ग्रिटींग कार्ड प्रदर्शनाचे उद्घाटन शाळा समिती सदस्य शरद वायंगणकर यांचे हस्ते करण्यात आले यावेळी शाळा समिती चेअरमन अरविंद महाडीक , शरद वायंगणकर , तळेरे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजू जठार , प्राचार्य अविनाश मांजरेकर , शिक्षक- पालक संघाचे उपाध्यक्ष संतोष पाटणकर, माईंड ट्रेनर सदाशिव पांचाळ , संतोष तळेकर , विजय पेडणेकर , उद्धव महाडीक , स्वप्निल कल्याणकर , निखिल जमदाडे , सुरज बिद्रे , सचिन वाडेकर , सागर डंबे, मिथिल डंबे ,अनुष्का नर ,जेष्ठ शिक्षक सी.व्ही. काटे , ए.बी. कानकेकर , पी. एन. काणेकर , डी.सी.तळेकर पी.एम.पाटील , एन.बी. तडवी , व्ही.डी.टाकळे , ए.बी. तांबे , एस.एन. जाधव , एस.यु,सुर्वे , एन.पी.गावठे , ए.पी.कोकरे , समीर चव्हाण , अंकीत घाडीगावकर , लिपीक राजेश तांबे, कल्पेश तळेकर , प्रकाश घाडी , देवेंद्र तळेकर , संदेश तळेकर आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,माजी विद्यार्थी , पालक ,विद्यार्थी उपस्थित होते.


ध्वजवंदनानंतर एनसीसी विभागप्रमुख एन.बी.तडवी तर स्काऊट गाईड प्रमुख डी. सी.तळेकर पी.एन. काणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एन.सी.सी. आणि स्काऊट गाईड विभागाचे कार्यक्रम पार पडले. विद्यालयातील परीपाठ ग्रुपमार्फत यावेळी राष्ट्रगीत , झेंडागीत तसेच देशभक्तीपर समूहगीतेही सादर करण्यात आली. तसेच वक्तृत्व , निबंध, चित्रकला ,पाढे पाठांतर , समूहगायन अशा विविध स्पर्धामध्ये मिळवलेल्या यशाबद्दल मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.


यावेळी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वेशभूषानीं सर्वांचे लक्ष वेधून घेतले . अंकिता शिंदे हिने भारत माता तसेच विराज नांदलस्कर ,लावण्य जोईल , मृणाल पेडणेकर , यश खरात , वैजयंती जंगले, रक्षा भोगले , मिताली खरात , सोहम झगडे , सुचित वरूणकर , केतकी वायंगणकर , सोहम खटावकर , रूद्र जाधव या विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकरल्या होत्या. यासाठी एस.एन.जाधव ,एन.पी.गावठे, एस.यु.सुर्वे यांनी मेहनत घेतली तर ग्रिटींग कार्ड , देशभक्तीपर समूहगायन विद्यालयाचे शिक्षक पी. एन. काणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ए.बी.कानकेकर यांनी तसेच आभार सी.व्ही . काटे यांनीं मानले

प्रतिक्रिया व्यक्त करा