स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त काँग्रेसपक्षा मार्फत सुरू असलेली आजादी गौरव पदयात्रा आज कणवलीत काढण्यात आली. पदयात्रेत तिरंगा डौलाने फडकत होता त्याच बरोबर याद करो कुर्बानी असे लिहिलेल्या फलकावरील महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु,सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, भगतसिंग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,लालबहादूर शास्त्री, गोपळकृष्ण गोखले अश्या अनेक स्वातंत्र्य सेनानीच्या फोटोमुळे स्वातंत्र्य चळवळीच्या आठवणीना उजाळा मिळाला. यावेळी देशभक्तीपर गीतानी वातारण प्रफुल्लित झाले होते. ‘भारत माता की जय’ ‘वंदे मातरम’ या घोषणानी वातावरण देशभक्तीमय झाले होते. या पदयात्रेत सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख, उपाध्यक्ष नागेश मोर्ये,मालवण विधानसभा उमेदवार अरविंद मोंडकर,जिल्हा सरचिटणीस महेंद्र सावंत,सांस्कृतिक विभाग जिल्हाध्यक्ष प्रवीणभाई वरुणकर, शहर अध्यक्ष महेश तेली, नादिरशा पटेल,प्रदीप तळगावकर, निलेश मांलडकर,राजेंद्र वर्णे,पंढरीनाथ पांगम,अक्षय घाडीगांवकर, प्रदीप कुमार जाधव,प्रमोद घाडीगांवकर इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त काँग्रेसपक्षा मार्फत कणवलीत आजादी गौरव पदयात्रा
- Post published:ऑगस्ट 14, 2022
- Post category:कणकवली / बातम्या
- Post comments:0 Comments