You are currently viewing माझ्या राजकारणाच्या जडणघडणीत राजघराण्याचा आणि समाजवादी विचारांचा प्रभाव

माझ्या राजकारणाच्या जडणघडणीत राजघराण्याचा आणि समाजवादी विचारांचा प्रभाव

नाम.दीपकभाई केसरकर यांचा सावंतवाडी येथे झाला भव्य नागरी सत्कार

ही.हा.खेमसावंत भोसले (राजेसाहेब) व माजी केंद्रीय कायदामंत्री विधीज्ञ रमाकांत खलप यांची खास उपस्थिती

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग मतदारसंघाचे लोकप्रिय नेते नाम.दीपकभाई केसरकर यांचा भव्य नागरी सत्कार सावंतवाडी येथील गांधी चौकात सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग मतदारसंघातील नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला. सावंतवाडी संस्थानचे राजे ही. हा.खेमसावंत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सत्कार सोहळ्यात माजी केंद्रीय कायदामंत्री गोवा येथील विधीज्ञ रमाकांत खलप यांच्या हस्ते नाम.दीपक केसरकर यांचे शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. नाम.दीपकभाई केसरकर यांचे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झाले. दोडामार्ग येथून प्रत्येक गावात भेट देत दीपक केसरकर यांनी मतदारांचे आशीर्वाद घेतच सावंतवाडीकडे प्रयाण केले. दोडामार्ग येथील बाजारपेठेत दोडामार्गचे भाजपा नगराध्यक्ष चेतन चव्हाण व नगरसेवकांनी नामदार दीपक भाई केसरकर यांचे स्वागत केले. दोडामार्गच्या जनतेने केलेल्या स्वागताने भारावलेले दीपक केसरकर यांनी शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह आपल्या मतदारसंघातील अनेक मतदारांचे स्वागत स्वीकारत सायंकाळी साडेसात वाजता सावंतवाडीत दाखल झाले.


स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भारताच्या तिरंग्याचे तीन रंग असलेले ७५ फुगे दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते अवकाशात सोडत गांधी चौक येथील व्यासपीठावर त्यांचे आगमन झाले. फटाक्यांच्या आतषबाजीत आणि टाळ्यांच्या कडकडाटात नाम.दीपक केसरकर यांचे मतदारसंघातील नागरिकांनी स्वागत केले. प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत पार पडलेल्या भव्य नागरी सत्कार सोहळ्या प्रसंगी बोलताना नाम.दीपक केसरकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना आणि भाजप युती केली होती, त्यांचे विचार घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार काम करत असून सर्वांगीण विकासासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. राजकारणासाठी राजकारण नव्हे तर विकासासाठी राजकारण करू, असे याप्रसंगी बोलताना नाम.दीपक केसरकर म्हणाले.


सत्कार सोहळा प्रसंगी बोलताना दीपक केसरकर पुढे म्हणाले की, सावंतवाडी संस्थानपासून माझे आजोबा वडिलांनी सामाजिक कार्य केले. त्यामुळेच राजसाहेबांनी त्यांना नगरसेठ हा किताब दिला होता. समाजसेवेतूनच माझा उगम झाला असून मला राजकारणात पाठविण्यासाठी आपल्या वडिलांचा विरोध होता. राजकारणात येऊन मला माझी वडिलोपार्जित मिळकत देखील विकावी लागली. माझ्या जडणघडणीत राजघराणे व समाजवादी विचारांच्या जयानंद मठकर यांच्या विचारांचा प्रभाव आहे.श्रीमंत शिवराम राजे भोसले यांनी मला आपल्या जीप मधून संपूर्ण मतदार संघात फिरवले. त्यामुळे त्यांच्याही विचारांचा आदर्श घेऊन मी पुढे चालतो. त्याचप्रमाणे मान.शरद पवार साहेबांनी मला चाळीसाव्या वर्षी लोकसभेची उमेदवारी देऊ केली होती, परंतु नंतर मात्र 54 व्या वर्षी विधानसभेची उमेदवारी मिळाली. मा.शरद पवार यांच्या समोर माझ्या बाबत गैरसमज करून दिल्यानंतर माझा अपमान झाल्यामुळे मी राष्ट्रवादी पक्ष सोडला. कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर पुढे म्हणाले की, शिवसेना पक्ष झुंजार नेत्यांचा पक्ष आहे, असे सांगून मी भाजपमध्ये संधी असूनही प्रवेश नाकारला होता.मान.उद्धव ठाकरे हे प्रेमळ व प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे, मला राज्यमंत्री बनविल्याने मी नाराज नव्हतो परंतु दुसऱ्यांदा निवडणूक लढवितांना मला जर मंत्री करायचे नव्हते तर विधानसभेची उमेदवारीच दिली नसती तरी चालले असते. मी शिवसेना सोडली नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन आणि उद्धव साहेब ठाकरे यांच्या स्वभावामुळे मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल, भाजी मंडई, कबुलायतदार गावकर जमीन प्रश्न अशा विविध विषयांवर अजून काम करायचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्या प्रयत्नातच या प्रश्नांसाठी वेळ देऊन ते सोडवले आहेत. मी उदयनराजे, छत्रपती संभाजी राजे आणि राजमातांचा आशीर्वाद घेऊन आलो आहे. विकासाच्या लढाईसाठी शिवसेना भाजप युती ही बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती, विकासासाठी प्रसंगी लढू. कष्टकरी महिला, युवक अशा सर्व पातळीवर विकासासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, असेही केसरकर यांनी पुढे बोलताना सांगितले.


नाम.दीपक केसरकर यांच्या सत्कार सोहळ्यातील प्रमुख पाहुणे माजी केंद्रीय कायदामंत्री विधीज्ञ रमाकांत खलप यांनी देखील दीपक केसरकर यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. विधीज्ञ रमाकांत खलप म्हणाले, मला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद मिळाले होते. सिंधुदुर्ग व गोवा यांचे नाते भावा बहिणीसारखे असून सिंधुदुर्गातील तिलारीचे पाणीच आम्ही गोवेकर पितो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथीलच मासे गोवेकरांना खाण्यासाठी मिळतात, गोव्यात मानकूर आंबा मोठ्या प्रमाणावर मिळतो, त्याला गोडीही आहे, परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूसची चव आमच्या जिभेवर नेहमीच येते. नाम.दीपक केसरकर यांना पर्यटन व पर्यावरण ही खाती मिळण्याची शक्यता असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोव्यापेक्षाही सुंदर असलेले समुद्रकिनारे विकसित होतील आणि पर्यटन दृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गोव्यासारखाच विकास होईल. गोवा आणि कोकण भूमी ही सुवर्णभूमी आहे, त्यांचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी दीपक केसरकर यांचे मंत्रीपद हे महत्त्वाचे आहे. कोकण, सावंतवाडीला मुख्यमंत्रीपद का मिळू नये? असा प्रश्न उपस्थित करत, कोकण भूमीने देशाला विविध विचारांची महान नर रत्ने दिली आहेत, याची आठवण विधीज्ञ माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांनी करून दिली. सावंतवाडी संस्थानचे राजे श्रीमंत खेमसावंत भोसले यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात नाम.दीपक केसरकर विकासासाठी प्रयत्न करणारे नेते आहेत, सर्वांगीण विकास करून सर्व जनतेच्या मनात आनंद निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा आणि दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे प्रयत्न करावेत असे म्हणाले.


या नागरी सत्कार सोहळ्यात सर्वप्रथम माजी नगराध्यक्ष व भाईसाहेब सावंत महाविद्यालयाचे अध्यक्ष विधीज्ञ दिलीप नार्वेकर यांनी दीपक केसरकर यांचा राजकारणातील प्रवेश आणि राजकीय प्रवास याच्यावर भाष्य करत, ३५ वर्षानी माजी आरोग्य मंत्री कै.भाईसाहेब सावंत यांच्यानंतर दुसऱ्यांदा सावंतवाडीला कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याचे सांगत जुन्या आठवणी सांगत सर्व लोकांमध्ये मनोरंजनात्मक भाषणातून हशा पिकवला. शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विकास भाई सावंत यांनी दीपक केसरकर यांचा चढता राजकीय आलेख जनतेसमोर मांडून त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी चौकूळ येतील चिखलवाडीतील बेरड समाज जो स्वातंत्र्यानंतर गेली कित्येक वर्षे अंधारात राहिला होता, त्यांना नाम.दीपक भाई केसरकर यांच्या माध्यमातून चिखलवाडी मध्ये पहिल्यांदा विजेची जोडणी देण्यात आल्याने बेरड समाजाच्या घरा रोषणाई झाली आहे. या बेरड समाजातील सर्व लोकांनी या सत्कार सोहळ्यात उपस्थित राहून दीपक केसरकर यांचे आभार व्यक्त केले. सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग मतदार संघातील अनेक मान्यवरांनी खास उपस्थित राहून पुष्पगुच्छ देऊन त्याचप्रमाणे हार घालून दीपक केसरकर यांना भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सत्कार सोहळ्यात प्रसंगी सत्कारमूर्ती कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर, श्रीमंत खेमसावंत भोसले, माजी केंद्रीय कायदामंत्री विधीज्ञ रमाकांत खलप, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, प्रांताधिकारी प्रशांत पानवेलकर, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, आनारोजीन लोबो, सत्कार समिती अध्यक्ष सुभाष पणदूरकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास भाई सावंत, आयुर्वेदिक महाविद्यालय संस्थेचे अध्यक्ष विधिज्ञ दिलीप नार्वेकर, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, तहसीलदार श्रीधर पाटील, व्यापारी संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर, माजी पंचायत समिती सभापती अशोक दळवी, माजी उपनगराध्यक्ष गोविंद वाडकर, आबा केसरकर, विधीज्ञ नीता कविटकर, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, शुभांगी सुकी, प्रकाश बिद्रे, माधुरी वाडकर, बोन्द्रे, अन्नपूर्णा कोरगावकर, प्रेमानंद देसाई, नंदू गावडे, नंदू शिरोडकर, गणेशप्रसाद गवस, बाळा शिरसाठ, रोनापाल सरपंच सुरेश गावडे, राजेंद्र निंबाळकर, संजय पेडणेकर, सुरेश सावंत, पंढरी राऊळ, भाई देऊलकर, रमेश बोंद्रे, सुधीर धुमे, कॉन्ट्रॅक्टर महेश पाटील, सतीश बागवे, लवू मिरकर, विश्वास घाग, जिल्हाभरातील प्रिंट मीडिया आणि सोशल मीडियाचे सर्व पत्रकार, आणि असंख्य नामदार दीपक भाई प्रेमी, कार्यकर्ते, लोक्रतिनिधी, अनेक गावांतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मतदार उपस्थित होते. नाम.दीपकभाई केसरकर यांच्या भव्य नागरी सोहळ्याचे प्रास्ताविक सत्कार सोहळा समितीचे प्रमुख विधीज्ञ सुभाष पणदूरकर यांनी तर सूत्रसंचालन सौ.मेघना राऊळ यांनी केले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + eight =