You are currently viewing डॉ. योगिता पेंडूरकर यांचे भाजपा तर्फे अभिनंदन 

डॉ. योगिता पेंडूरकर यांचे भाजपा तर्फे अभिनंदन 

 

सिंधुदुर्गातील कनेडी गावात जन्मलेल्या डॉ योगिता पेंडूरकर यांची आज असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया ठाणे विभागाच्या एक्झिक्युटिव्ह कमिटी वर नियुक्ती झाल्याबद्दल डॉ अमेय देसाई यांनी भाजपा वैद्यकीय आघाडीच्या कोकण प्रभारी या नात्याने त्यांचे अभिनंदन केले. डॉ पेंडूरकर या कनेडी गावातील माध्यमिक शाळा तसेच इयत्ता बारावी पर्यंत एस.एम. हायस्कूल आणि महाविद्यालयात विद्यार्थीनी होत्या. पुण्यातील ससून रुग्णालयात एम.बी.बी.एस चे शिक्षण घेऊन त्यानंतर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात जनरल मेडिसिन मध्ये त्यांनी पद्वीओत्तर शिक्षण घेतले तसेच युरोपियन असोसिएशनच्या त्या संधीवात व संबंधित आजारांच्या शाखेच्या फेलो आहेत. सुरुवातीला दोन वर्षे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात अध्यापक म्हणून त्यांचा कार्यकाळ राहिला असून गेल्या पाच वर्षांपासून ठाण्यातील प्रतिथयश ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्या फिजिशियन म्हणून कार्यरत आहेत. आज सिंधुदुर्गाच्या या कन्येला मिळालेल्या बहुमानाने जिल्ह्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे!

प्रतिक्रिया व्यक्त करा