You are currently viewing मसुरे सुपुत्र विष्णू परब यांची ठाणे येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी निवड…..

मसुरे सुपुत्र विष्णू परब यांची ठाणे येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी निवड…..

मसुरे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा..

 

मसुरे  :

 

मसुरे गडघेरा वाडीचे सुपुत्र विष्णू उर्फ सुरेश दत्ताराम परब याची मुंबई ठाणे येथे नुकतीच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. विष्णू हे ठाणे पोलीस मुख्यालय येथे कार्यरत असून आपल्या पोलीस दलातील ३१ वर्ष चार महिने सेवा पूर्ण केली आहे. विष्णू परब यांच्या या निवडीबद्दल मसुरे गावातून अभिनंदन होत आहे.

विष्णू उर्फ सुरेश परब हे मसुरे गडघेरा वाडीचे सुपुत्र असून लहानपणापासूनच सर्व क्षेत्रात ते नेहमी पुढे असायचे. मसुरे येथील होल मसुरे, सिक्स फायटर शूटिंग बॉल संघाचे प्रतिनिधित्व करता करता ठाणा जिल्हा ते महाराष्ट्र शूटिंग बोल संघाचे सुद्धा त्यांनी प्रतिनिधित्व केले होते. देशपातळीवरतीही आपल्या शूटिंग बॉल खेळाने त्याने मसुरे गावाचे नाव उज्वल केले होते. पोलीस दलातील अनेक गौरवास्पद कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. पोलीस दलात प्रामाणिकपणे सेवा बजावत असताना अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. यावेळी बोलताना विष्णू परब म्हणालेत यापुढेही आपल्या भूमीचे आणि पोलीस दलाची शान राखून आपण कार्य करणार असून, सर्व सामान्यांना न्याय मिळवून देऊन पोलीस दलाची प्रामाणिकपणे सेवा करण्याचा मानस व्यक्त केला. त्यांच्या या निवडी बद्दल उद्योजक डॉक्टर दीपक परब, उद्योजक दीपक सावंत, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष बाळा गोसावी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभू गावकर, सौ सरोज परब, माजी पंचायत समिती सदस्य गायत्री ठाकूर, मर्डे सरपंच संदीप हडकर, उपसरपंच पिंट्या गावकर, मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे मालवण तालुका अध्यक्ष डॉ साठे, माजी पंचायत समिती सदस्य महेश बागवे, छोटू ठाकूर, शूटिंगबॉल खेळाडू प्रदीप पाटकर, सुनील प्रभूगावकर, शिवाजी परब, बबन राणे, हनुमंत प्रभू, हिरबा तोंडवळकर, प्रमोद बागवे, श्री लक्ष्मण शिंगरे ,बाळू दळवी, अवधूत चव्हाण, शैलेश मसुरकर, दत्तप्रसाद पेडणेकर यांनी अभीनंदन केले आहे. येत्या गणेश उत्सवात विष्णू परब हे गावी येणार असून होल मसुरा शूटिंग बोल संघ आणि मसुरे ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांचा नागरिक सत्कार करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा