You are currently viewing

आदिवासी – कातकरी लोकांनी चुकीचा प्रकार पाडला बंद

कणकवली

जमीन एकाची, त्यावर घरे दुसऱ्याची आणि घर पत्रकाचे उतारे तिसऱ्याच १८ लोकांना देण्याचा सुरू असलेला प्रयत्न कणकवली येथील आदिवासी – कातकरी लोकांनी हाणून पाडला. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, आणि कणकवली चे बीडीओ अरुण चव्हाण यांनी दोन दिवसात घरप्रकाचे उतारे देणार अशी घोषणा करून ज्यांचा त्या जागेवर आणि घरांवर काहीच संबंध नाही त्याची नावे दुसऱ्यांच्या घरांवर( झोपड्यावर) चढविण्यास सुरुवात केली. त्यानंतर ही गोष्ट कातकऱ्यांच्या लक्षात येतात प्रामाणिक असलेल्या कातकऱ्यानी एकत्र येत प्रथम फोंडाघाट ग्रामपंचायतला आणि नंतर कणकवली गटविकास अधिकाऱ्यांना आम्हाला दुसऱ्यांच्या जागेत आणि दुसऱ्यांच्या घरावर असेसमेंटचे उतारे नकोत. आम्हाला स्वतःच्या हक्काचे घर द्या. तेही शहराच्या ठिकाणी द्या,अशी भूमिका मांडली. त्यामुळे अखेर चुकीच्या पद्धतीने सुरू असलेले काम बंद पाडले.
दरम्यान कणकवली प्रांताधिकारी यांनाही या संदर्भातली माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली असून घरांसाठी स्वतंत्र बैठक लावून त्यात कणकवली शहरात ज्यांना घरे हवी आहेत त्यांना ग्रामीण भागात पाठवू नका तर त्यांना शहरातच भूखंड आणि घरे द्या अशी या कातकरी बांधवांनी मागणी केली.
कणकवली पंचायत समितीला आज कातकरी समाजाच्या काही प्रतिनिधींनी भेट दिली व आपले निवेदन दिले. चुकीच्या पद्धतीने सुरू असलेली घर पत्रकाच्या उत्तराऱ्याची नोंद थांबवा.आमची नावे त्यावर घालू नका. आम्हाला दुसऱ्यांच्या घरात आणि जमिनीवर हक्क नको.असे सांगून शहरातच आम्हाला जमीन आणि घर द्या अशी मागणी केली. यावेळी कल्पना शांताराम पवार , बाबु बाळाराम पवार , पांडू विजय निकम,उमेश बाबा निकम , संजय श्रीराम निकम , सदिय श्रीराम निकम , बबन बाळाराम पवार . शांता मधुकर पवार . अशा कातकरी बांधवांनी उपस्थिती लावली होती विस्तार अधिकारी पालकर,देवरुखकर यांच्या समवेत यावेळी त्यांनी चर्चा केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा