You are currently viewing ‘एक राखी माझ्या सैनिकासाठी’ वेंगुर्ले तालुक्यातील शाळा दाभोली नं 2 चा स्तुत्य उपक्रम

‘एक राखी माझ्या सैनिकासाठी’ वेंगुर्ले तालुक्यातील शाळा दाभोली नं 2 चा स्तुत्य उपक्रम

वेंगुर्ला :

 

रक्षाबंधनच्या निमित्ताने शाळा दाभोली नं 2, वेंगुर्ले च्या विद्यार्थ्यांनी आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी ‘एक राखी माझ्या सैनिकासाठी’ या उपक्रमांतर्गत स्वतः बनवलेल्या राख्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना पाठवल्या. विद्यार्थ्यांना राख्या बनवण्यासाठी व आपल्या सैनिकांना राखी पोहोचविण्याबाबत शाळेचे पदवीधर शिक्षक श्री प्रशांत भालचंद्र चिपकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी ही अतिशय उत्साहाने या उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. अतिशय कौशल्यपूर्वक व कष्टाने विद्यार्थ्यांनी या राखा बनवल्या. देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांबद्दल यावेळी विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मराठे मॅडम तसेच सहकारी शिक्षक, पालक यांनी हा उपक्रम राबविल्याबद्दल मार्गदर्शक श्री प्रशांत चिपकर सर तसेच विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा