सावंतवाडी :
सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड पंचक्रोशि हायस्कूलमध्ये मोबाईलचे फायदे तोटे या विषयावर चर्चासत्र संपन्न झाले.
हर घर तिरंगा अंतर्गत 8 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या दरम्यान शासन स्तरावरून आलेल्या परिपत्रकानुसार ठरवून दिलेल्या कार्यक्रमांचे नियोजन ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेकडून करण्यात येत आहे. 12 ऑगस्ट रोजी युवक-युवती, ग्रामस्थ करिता तसेच शाळेतील विद्यार्थ्यांकरीता मोबाईलचे फायदे तोटे या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात मळेवाड पंचक्रोशि हायस्कूलमधील विद्यार्थी पालक, ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, आशासेविका, शिक्षक यांनी सहभाग घेतला होता. या चर्चासत्रात दोन गटांमध्ये चर्चासत्र घेण्यात आले. या चर्चासत्रासाठी सरपंच मिलन पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर जाधव, तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, अंगणवाडी सेविका आशा सेविका, शिक्षक उपस्थित होते.