You are currently viewing आज दिवस सोन्याचा

आज दिवस सोन्याचा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी रामदास अण्णा लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आज दिवस सोन्याचा*

 

आज दिवस सोन्याचा।

रक्षाबंधनाचा सण।

बंधु येईल घ्यायला।

माझं ओलं होई मन।।

 

बहिण भावाला।

जशी ईश्वराचं देणं।

तिचा हात डोक्यावर।

फुलून जाई मन।।

 

बहीण आणि भाऊ।

ईश्वराचे दोन मोती।

बहीण-भावाच्या नात्याचे।

गुणगान गावे किती।।

 

सुगंध या नात्याचा।

दरवळते चंदन।

रक्षाबंधनाच्या दिनी।

माझ्या ताईला वंदन।।

 

भाऊ बहिणीचं नात।

जशी साखर भातात।

एक रेशमाचा धागा।

माझ्या भावाच्या हातात।।

 

माझी कविता

रामदास आण्णा

©सर्व आधिकार आरक्षित

प्रतिक्रिया व्यक्त करा