महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात गेली कित्येक वर्षे समाजाभिमुख काम करणाऱ्या स्नेहालय या सामाजिक संस्थेच्या वतीने अहमदनगर येथे दिनांक तेरा आॅगस्ट ते पंधरा आॅगस्ट या कालावधीत आझादी अमृत महोत्सव युथ कॅम्पचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. स्नेहालय ही सामाजिक संस्था गेली कित्येक वर्षे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली एड्स, तस्करी व लैंगिक अत्याचारास बळी पडलेल्या मुलासाठी व महिलांच्या पुनर्वसनासाठी काम करणारी संस्था असून पुण्यामध्येही कृषी क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य सुरू आहे.
आझादीच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून स्नेहालयने तीन दिवसाच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केलेले असून या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मा. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, पद्मश्री पोपटराव पवार, देशाचे माजी न्यायमूर्ती मा. हेमंत गोखले, पद्मभूषण अण्णा हजारे, निवृत्त मेजर जनरल मा. जुबान दास तसेच देशात विविध क्षेत्रात काम करणारी अनुभवी मंडळी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
सिंधुदुर्ग कन्या व भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यात मास्टर डिग्री घेतेलेली आणि पुण्यात वयम् डान्स स्टुडिओच्या माध्यमातून कलाक्षेत्रात कार्यरत असलेल्या नृत्यांगना स्नेहल पार्सेकर आणि तिच्या चमुला विशेष कार्यक्रमासाठी निमंञित करण्यात आले असुन तेरा आॅगस्टला तिचा भारतीय संस्कृतीच जनमानसावर प्रतिबिंब उठवणारा कार्यक्रम होणार आहे. यापुर्वी तिचे जपान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सव तसेच महाराष्ट्र, गोवा राज्यातही नृत्याचे अनेक कार्यक्रम झालेले आहेत.