You are currently viewing जिल्ह्यातील 167 गावे हागणदारी मुक्त अधिक स्वातंत्र्य दिनी होणार घोषणा

जिल्ह्यातील 167 गावे हागणदारी मुक्त अधिक स्वातंत्र्य दिनी होणार घोषणा

सिंधुदुर्गनगरी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वाच्छ भारत मिशन (ग्रामिण) टप्पा 2 अंतर्गत जिल्ह्यातील अंदाजित 167 महसुल गावं हागणदारी मुक्त अधिक (ODF+) दि. 15 ऑगस्ट 2022 रोजी घोषित करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर व पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांनी दिली.

            जिल्हा हागणदारी मुक्त झाल्यानंतर जिल्ह्याची वाटचाल हागणदारी मुक्त अधिक (ODF+) कडे सुरू झाली आहे. यामध्ये गावातील वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाचा वापर गावातील कुटुबांकडून होत असला पाहिजे. तसेच गावातील एकही व्यक्ती उघड्यावर शौचास जाता कामा नये. गावातील सांडपाण्यासाठी वैयक्तिक किंवा सार्वजनिक ठिकाणी शोषखड्डे निर्मिती तर घनकचऱ्यासाठी खतखड्डे उभारणे गरजेचे आहे. प्लास्टिक कचऱ्यासाठी प्लास्टिक संकलन शेड व गावातील कचरा गोळा करण्यासाठी बॅटरी ऑपरेटेड व मॅन्युअल ट्रायसायकल घेणे गरजेचे आहे. हे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या 115 गावांना पहिल्या टप्प्यात हागणदारी मुक्त अधिक म्हणून घोषित केले आहे.

            दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील अंदाजित 167 महसुल गाव हागणदारी मुक्त अधिक म्हणून घोषित करण्यात येणार आहेत. यामध्ये देवगड तालुक्यातील 53, दोडामार्ग -5, कणकवली – 3, कुडाळ – 12, मालवण – 45, सावंतवाडी – 12, वैभववाडी – 24 तर वेंगुर्ला – 13 गावांचा समावेश आहे. प्रत्येक्ष भेटींच्या माध्यमातून या गावांची निवड करण्यात आली असल्याची माहिती ही मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नायर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ठाकूर यांनी दिली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा