दोडामार्ग
स्वतःच्या शेतात गवा रेड्याला विजेचा शॉक देऊन मारणाऱ्या दोडामार्ग येथील सुनील गवस याला येथील न्यायालयात हजर केले असता त्याला १३ ऑगस्ट पर्यंत वन कोठडी देण्यात आली. हा प्रकार दोन दिवसापूर्वी पणतुर्ली येथे उघड झाला होता. आपल्या शेतात आलेल्या गव्याला त्याने विजेचा झटका दिला होता. यात गव्याचा मृत्यू झाला. दरम्यान आपल्या शेतात गवा रेड्याचा मृत्यू झाला, अशी तक्रार घेऊन तो पोलीस ठाण्यात गेला. मात्र त्यानंतर झालेल्या तपासत त्याचा हा सर्व बनाव उघड झाला. काल त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. तर आज त्याला तेथील न्यायालयात हजर करण्यात आले.