वेंगुर्ले
भारताच्या स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव निमित्त आज वेंगुर्ले येथील खर्डेकर महाविद्यालयातील पटांगणावर सामुदायिक राष्ट्रगीत गाऊन आणि त्यानंतर महाविद्यालया पासून संपूर्ण वेंगुर्ले शहरात मोटरसायकल तिरंगा रॅली काढून जनजागृती करण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने वेंगुर्लेवासीय उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
महाविद्यालयात सकाळी सामुदायिक राष्ट्रगीत कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, नगर परीषदेचे मुख्याधिकारी डॉ. श्री अमितकुमार सोंडगे माजी नगराध्यक्ष श्री. दिलीप गिरप, डॉ. पूजा कर्पे, माजी नगरसेवक श्री. प्रशांत आपटे, श्री. विधाता सावंत, शितल आगचेकर, सौ. कृपा गिरप, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, माजी उपनगराध्यक्ष अभी वेंगुर्लेकर, प्रिन्सिपल एम.आर. देसाई इंग्लिश मेडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ मिताली होडावडेकर, नगरपरिषद कार्यालयीन अधिक्षक सौ. संगीता कुबल, श्री. रमेश नार्वेकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनिल रेडकर, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ.स्मिता दामले, ॲड. सूर्यकांत प्रमुखानोलकर, अँड. जी. जी. टांककर, श्री. सुरेंद्र खामकर, भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, ॲड. सुषमा खानोलकर, बावली वायंगणकर, जया वायंगणकर, पाटकर हायस्कूल किशोर सोन्सुरकर, प्रा. आनंद बांदेकर, साईप्रसाद नाईक, श्री. सुरेंद्र चव्हाण, सौ. शिवानी आळवे आदींसह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, नगरपरीषद कार्यालयाचे कर्मचारी, खर्डेकर महाविद्यालयाचे एम.एस.एस, एन.सी.सी, आजीवन आययन व विस्तार विभाग तसेच इतर विद्यार्थी प्राचार्य एम. आर. देसाई इंग्लीश मेडीयम स्कूल, होमिओपॅथिक कॉलेज, पाटकर हायस्कूल, एन.सी.सी विद्यार्थी व वेंगुर्ल्यातील नागरीक सहभागी झाले होते. सामुदायिक राष्ट्रगीत गायन कार्यक्रमानंतर तिरंगा दुचाकी रॅली ला प्रारंभ झाला. ही रॅली खडेकर महाविद्यालयापासून वेंगुर्ला मार्केट, जूना एस.टी. स्टॅन्ड मार्गे पिराचा दर्गा, बॅ.नाथ पै मार्ग कॅम्प वेंगुर्ला पर्यंत रॅली काढून शहरात अमृत महोत्सवाची जनजागृती करण्यात आली.