You are currently viewing सातार्डा – कवठणी- कीनळे येथील काजवी पुलाला अखेर मंजूरी

सातार्डा – कवठणी- कीनळे येथील काजवी पुलाला अखेर मंजूरी

१ कोटी ९० लाख रूपये निधी मंजूर

गेली अनेक वर्षे सातत्याने मागणी असलेल्या सातार्डा येथील काजवी पुलाला अखेर मंजुरी मिळाली आहे.
सातार्डा- कीनळे- कवठणी मार्गावरील आरोंदेकर यांचे निवासस्थाना नजिक असलेल्या कालवी पुलासाठी १ कोटी ९० लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, माजी राज्यमंत्री तथा आ. दीपक केसरकर यांच्या प्रयत्नाने गेली अनेक वर्षे मागणी असलेला काजवी पुल होणार आहे. सामाजिक कार्यकर्ते सुधा कवठनकर, रामेश्वर कवठनकर संदेश कवठणकर, संजय कवठणकर यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. दरम्यान,पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम पूर्ण करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद मतदार संघातील शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसेनेने केली आहे. पुलाच्या बांधकामासाठी निधी मंजूर झाल्याबद्दल सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + three =