*मंगळवारी पार पडला माजी सैनिकांचा कार्यक्रम*
कुडाळ / रानबांबुळी :
सैनिकांचे गाव म्हणून ओळखला जाणाऱ्या कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवारी आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमास प्रारंभ झाला. गावाच्या विकासासाठी एकत्र येत विकास कामांना सहकार्य करणारे गाव म्हणून रानबांबुळी गावाची सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओळख आहे.
मंगळवारी रानबांबुळी ग्रामपंचायत कार्यालयात आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत माजी सैनिकांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी भगतसिंग ,सुखदेव, राजगुरू, या कांतिवीरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी गावचे सरपंच वसंत रमेश बांबुळकर, उपसरपंच सतिश अमृत परब तसेच माजी सैनिक अशोक परब तसेच फ्रान्सिस कैतान सिकेर, नामदेव महादेव मेस्त्री, हेमंत बाबणी गवस, एस. के. सावंत ,शंकर लक्ष्मण गाड, संजय शंकर लाड ,अंजली सचिन कदम,दिशा दिलीप ठाकूर, इत्यादी उपस्थित होते.