कुडाळ :
कुडाळ पंचायत समितीने आज ९ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला धूमधडाक्यात शानदार सुरुवात झाली. देशाभिमान जागृत करणारी स्फूर्ती गीते या वेळी सादर करण्यात आली. हर घर तिरंगा अंतर्गत कर्मचाऱ्यांना तिरंगाचे वितरण करण्यात आले. उद्या १० ऑगस्टला पंचायत समितीच्या ३१ विभागाअंतर्गत समरगीत स्पर्धा होणार आहेत.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशाभिमान जागरूक करणाऱ्या विविधांगी उपक्रमांनी दिमाखात साजरा करण्यासाठी कुडाळ तालुका पंचायत समिती प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सज्ज झाली आहे. आज ९ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून १७ ऑगस्ट पर्यंत विविध देशभक्तीपर गीते, देशाभिमान जागृत करणाऱ्या विविध स्पर्धा यांच्या माध्यमातून हा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
आज ९ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून सर्व कर्मचाऱ्यांनी लाल ड्रेस परिधान केला होता. सर्व कर्मचाऱ्यांना घरघर तिरंगा अंतर्गत तिरंगाचे वितरण करण्यात आले. प्रत्येक कार्यालयांसाठी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव असणारा आकाम लोगो देण्यात आला. तसेच कर्मचाऱ्यांना आकाम लोगोचा बॅच देण्यात आला. पंचायत समितीच्या प्रांगणात साकारलेल्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त साकारलेल्या सेल्फी पॉइंटचे उद्घाटन दिवाणी न्यायाधीश क स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग १ कुडाळ सौ. अश्विनी बाचुलकर सह दिवाणी न्यायाधीश क स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग १ कुडाळ पवन ढोरे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सहायक गटविकास अधिकारी श्री. बाळकृष्ण परब, बाल विकास प्रकल्प अधिकारी गीता पाटकर पई , गट शिक्षणाधिकारी श्री. संदेश किंजवडेकर, उपअभियंता जलसंधारण श्री. लक्ष्मण डुबळे, तालुका वैदयकीय अधिकारी श्री. संदेश कांबळे, कृषि अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, विस्तार अधिकारी रामचंद्र जंगले, संजय ओरोसकर, श्री गणेश राठोड एम एस आर एल एम, कक्ष अधिकारी मृणाल कार्लेकर, संजय चौकेकर, नंदकुमार धामापुरकर, रवी पोवार, पूजा पिंगुळकर, श्री खरात, श्री सावंत, श्री जाधव, श्री आंबेरकर, अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव ९ ते १७ या कालावधीत विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. उद्या १० ऑगस्ट ला या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या ३१ विभागाअंतर्गत समरगीत स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आरोग्य विभागाचे प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय (६) संघ, शिक्षण विभागचे बिट निहाय (६) संघ, NRLM चे प्रभाग निहाय (९) संघ, बाल विकास प्रकल्प अधिकारी बीट निहाय (८) संघ, पंचायत समिती अधिनस्त सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पशुसंवर्धन विभागाचा संघ असणार आहे.
यावेळी बोलताना श्री विजय चव्हाण म्हणाले, १५ ऑगस्टला आपण “आझादी का अमृत महोत्सव” साजरा करत आहोत. आपला भारत देश स्वतंत्र होण्यासाठी अनेक वीरांनी बलिदान देऊन शहीद झाले. त्या सर्व वीरांप्रती देशाभिमान जागरूक झाला पाहिजे. प्रत्येकाच्या मनात देशाभिमान रुजला पाहिजे. यासाठी सरकारने “आझादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा” हा देशाभिमान जागरूक करणारा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी कुडाळ तालुक्यात हा महोत्सव दिमाखात आणि धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी कुडाळ तालुका सज्ज झाला आहे. हा अमृत महोत्सव आनंदीमय व धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी कुडाळ तालुक्यातील सर्वानी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री चव्हाण यांनी केले आहे.
*नऊ दिवस पोषणयुक्त रंगाचा महोत्सव*
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून एकात्मिक बालविकास कुडाळ विभागाच्या वतीने घर घर तिरंगा त्याचप्रमाणे हर घर पोषण या घोषवाक्यानुसार सलग नऊ दिवस पोषणयुक्त रंगांचा महोत्सव साजरा केला जाणार आहे. यामध्ये ९ ते १७ या कालावधीत रंगांच्या साड्या, पोषणयुक्त फळे, भाजीपाला आदींचा समावेश असणार आहे.