You are currently viewing नेहरू युवा केंद्रातर्फे घरोघरी तिरंगा उपक्रम

नेहरू युवा केंद्रातर्फे घरोघरी तिरंगा उपक्रम

सिंधुदुर्गनगरी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत नेहरु युवा केंद्रातर्फे घरोघरी तिरंगा उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक तालुक्यात घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात येत आहे. युवा मंडळ विकास कार्यक्रम राबवण्यात येत असून प्रत्येक गावात युवा मंडळ स्थापन करण्यात येत आहेत.

            15 ऑगस्ट पर्यंत स्वच्छता जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. नेहरु युवा केंद्र गावाधारित सलग्न युवा क्लबच्या माध्यमातून युवा सक्षमीकरणाचे विविध उपक्रम हाती घेते. ज्यामुळे राष्ट्र उभारणी प्रक्रियेत युवकांचा सहभाग सुलभ होतो. प्रत्येक मंडळ जोडताना त्यात कमीतकमी 7 सदस्य आवश्यक आहे. सर्व सदस्यांची वयोमर्यादा 15 ते 29 अशी आहे. अध्यक्ष, सचिव, खजिनदार यांची वयोमर्यादा 18 ते 29 आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + eight =