गटविकास अधिकाऱ्यांची माहिती; झेंडा फडकवताना आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन…
सावंतवाडी
“घरोघरी तिरंगा” या अभियानाअंतर्गत सावंतवाडी तालुक्यातील तब्बल ३६ हजार ५४१ घरांवर तर ६२१ शासकीय इमारतीवर तिरंगा फडकविण्यात येणार आहे. यात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, शाळा, अंगणवाड्या आदी शाळांचा समावेश आहे, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी दिली. दरम्यान हे अभियान यशस्वी करण्यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात येणार असून लोकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवावा, त्याची शान जाऊ नये यासाठी आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी श्री.नाईक यांनी केले.
श्री. नाईक यांनी पंचायत समिती कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रशांत चव्हाण, सुदेश राणे, एस एस आदाणकर,कल्पना बोडके, संध्या भोरे, विनायक पिंगुळकर, जितेंद्र पाटील, सारिका जाधव आदी अधिकारी उपस्थित होते.