जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना
मैत्री सुध्दा *रडते*
ठेऊन डोक खांद्यावर
विश्वास असावा लागतो
एकमेकांचा एकमेकांवर
//१//
मैत्रीला नसतं *लिंग*
नर नारीसारख चावट
निखळ असतो ओलावा
*गोड* आंबट खारट
//२//
मैत्री असते मुरलेली
मुरंबा लोणच्या सारखी
*सदाच* असते ती
*राधा-कृष्णाची* सखी
//३//
लागता एकाच्या *ठेच*
नयनी *पाणी* दुस-याच्या
काटा *रुतो* कुणाच्या
कण्हणे मुखी *मित्राच्या*
//४//
मैत्री झाली अजरामर
कृष्ण सुदामा गोष्टींतून
विसरून जातो सारे
विश्वास हवा *दृष्टीतून*
//५//
विनायक जोशी🥳 ठाणे
मीलनध्वनी:९३२४३२४१५७
२९८/रविवार/७ आॅगष्ट २२