You are currently viewing दत्तमंदिर मित्रमंडळ आयोजित नारळ लढविणे स्पर्धेत महेश शिरपुटे विजयी तर आनंद आचरेकर उपविजयी…

दत्तमंदिर मित्रमंडळ आयोजित नारळ लढविणे स्पर्धेत महेश शिरपुटे विजयी तर आनंद आचरेकर उपविजयी…

मालवण

दत्त मंदिर भरड मालवण मित्रमंडळ यांच्यावतीने दत्त मंदिर येथे आज आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित नारळ लढविणे स्पर्धेत महेश शिरपुटे विजेते तर आनंद आचरेकर उपविजेते ठरले.

महेश शिरपुटे यांना ५,५५५ रुपये, चषक तर आनंद आचरेकर यांना ३३३३ रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत १६ स्पर्धकांनी सहभाग घेतला. दत्त मंदिरचे पुजारी बाळू काजरेकर, उमेश मांजरेकर, ग्लोबल रक्तदाताचे ग्रुपचे संघटक विजय पांचाळ, सचिन गिरकर, प्रकाश करंगुटकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

यावेळी करण खडपे, मंदार ओरसकर, शैलेश मालंडकर, अमेय देसाई, स्वप्नील गवंडी, दत्तप्रसाद वेर्लेकर, गौरव वेर्लेकर, जयंत शिरपुटे, अण्णा माणगावकर, अंश वाळके, स्पर्श वाळके, विकी माळगावकर, भूषण गवंडी हे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × two =