You are currently viewing घेई अवतार देव याचा विश्वास पटावा

घेई अवतार देव याचा विश्वास पटावा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री.अरविंद ढवळीकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

घेई अवतार देव याचा विश्वास पटावा
असा एखादा गोजिरा आता अंकूर फुटावा

माय धारित्रीची कूस
जणू सोनियाची मूस
तिच्या पुत्रांचाच वैरी
असा कसा रे माणूस
तिचा निसर्ग संसार याने कसाही लुटावा…….

करी गंगा ही दूषित
देवा तुझा हा प्रेषित
करी वनांचा संहार
रक्त प्राण्यांचे शोषित
तुझी संतांची ही भूमी त्यात कसा हा दुष्टावा……
.
फुटो अंकूर मनांत
जावो बुद्धी विपरीत
असे तुझ्याच कृपेनें
कांही घडावे आक्रित
वृक्ष वेलिंचा सोयरा एक तुकोबा भेटावा…..
असा एखादा गोजिरा आता अंकूर फुटावा

अरविंद

प्रतिक्रिया व्यक्त करा