मुंबई
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील तांबळडेग येथील शासकीय मत्स्यव्यवसाय शाळेच्या विद्यार्थ्यीप्रिय शिक्षिका श्रीमती उर्मिला एकनाथ कोचरेकर यांनी दि. ४/८/२०२२ रोजी सायंकाळी ६.४५ वाजता भांडुप येथे अखेरचा श्वास घेतला. मुत्यूसमयी त्या ७८ वर्षाच्या होत्या. शैक्षणिक क्षेत्राबद्दल शेवटच्या श्वासापर्यंत आस्था असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून त्या परिचित होत्या . अतिशय संयमी साधी राहणी उच्च विचारसरणी खऱ्याअर्थाने प्रत्यक्ष जीवनात अनुभवली आपल्या विद्यार्थ्यांनी खूप मोठे व्हावे पण आपल्या शाळेला आणि समाजाला विसरू नये असे त्याचं सांगणे होते. अद्यापन आणि अध्ययन यावर त्यांची कमांड होती. मुलांना कठीण वाटणारा विषय सोपा भाषेत समजेल उमजेल अशा प्रकारे शिकवण्याची पद्धत विद्यार्थ्यांना आपलीशी करून गेली. काल संध्याकाळी उर्मिला कोचरेकर बाई गेल्याचे दुःख पचविणे त्यांच्या विद्यार्थ्यांना जड जात होते. त्यांचा स्वभाव लोभसवाणा होता पण परोपकारी वृत्ती होता . त्यांच्या पश्चात कर्तव्यदक्ष पोलिस महेंद्र, विष्णू, सनूबाई विवाहित मुलगी तनुजा, जावई तुकाराम तथा नाना मोंडकर,दीर मोहन ,जावा राजश्री, मनिषा , मोहनी , पुतणे असा मोठा परिवार आहे. रात्री उशिरा भांडुप येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांनी कोचरेकर बाईच्या जाण्याने पोकळी निर्माण झाल्याचे आपल्याला शोक संदेशात म्हटले आहे.