You are currently viewing सावंतवाडी शहरातच मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल होणार – लखम राजे भोसले

सावंतवाडी शहरातच मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल होणार – लखम राजे भोसले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शवली सहमती

सावंतवाडी

सावंतवाडी शहरातच मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल होणार असल्याचे सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल साठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहमती दर्शवली असून त्यांनी तसा शब्द दिला आहे असे सांगितले.

बाजारभावापेक्षा जास्त या जमिनीचे मूल्य देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे शहरातच व्हावे यासाठी जमीन मूल्याबाबत जनतेसाठी आपण एक पाऊल मागे यायला तयार आहे त्यामुळे रेडीरेकरण प्रमाणे मूल्य दिल्यास आपण ते स्वीकारू आणि रुग्णालय व्हावे अशी आपली इच्छा आहे असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले त्यामुळे आता सावंतवाडी शहरातील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चा मार्ग सुकर झाल्याचे स्पष्ट झाले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा