*कासव संवर्धन उपक्रमाचा आ. वैभव नाईक यांच्या हस्ते शुभारंभ*
मालवण :
नांदरूख गिरोबा मंदिर देवालय येथील तलावाला लोकसहभागातून बंधारा बांधण्याचे काम सुरु असून आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक व शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी नांदरूख येथे भेट देत बंधारा कामाची पाहणी केली.
यावेळी आ. वैभव नाईक यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत बंधारा कामाचा व गावातील इतर विकास कामांचा आढावा घेतला.
दरम्यान येथील तलावामध्ये कासव संवर्धन उपक्रम ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येत असून आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते तलावामध्ये कासव सोडून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी मालवण पंचायत समीती विस्तार अधिकारी व्ही. के. जाधव, लघु-पाटबंधारे सहायक अभियंता श्री. भोसले, नांदरूख सरपंच दिनेश चव्हाण, ग्रामसेवक महेंद्रभाऊ मोरे, तलाठी सौ. संजना सावंत, युवासेना कुंभारमाठ पं.स. उप विभागप्रमुख राहुल परब, सामाजिक कार्यकर्ते महेश जुवाटकर, शाखाप्रमुख समीर पाटकर, ग्रामपंचायत सदस्य हरिश्चंद्र लाड, सलोनी पाटकर, आंबडोस ग्रा.प सदस्य शाखाप्रमुख विशाल धुरी, नंदकिशोर चव्हाण, संदेश घाडी, सतीश कांबळी, मेघा सावंत, गोविंद चव्हाण, काशिनाथ चव्हाण,घनश्याम परब आदि उपस्थित होते.