You are currently viewing माजी नगराध्यक्ष प्रेमानंद उर्फ बबन साळगावकारांना आम.दीपक केसरकर समर्थकांचे सडेतोड प्रत्युत्तर

माजी नगराध्यक्ष प्रेमानंद उर्फ बबन साळगावकारांना आम.दीपक केसरकर समर्थकांचे सडेतोड प्रत्युत्तर

 

सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबनराव साळगावकर यांनी माजी पालकमंत्री आमदार दीपक भाई केसरकर यांच्याविरुद्ध केलेले वक्तव्य म्हणजे स्वतःचे राजकीय पुनर्वसनासाठी केलेला बालिश प्रयत्न होय. प्रेमानंद उर्फ बबन साळगावकर हे नगराध्यक्ष झाले होते ते केवळ दीपक भाईंच्या कृपेमुळेच हे सावंतवाडीकर जनतेने सिद्धच केले आहे. आमदार दीपक केसरकर यांच्या पाठिंब्यावर साळगावकरांना 2016 च्या निवडणुकीत 4815 मते आणि दीपक भाईंची साथ सोडून राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतल्यावर 2019 च्या नगराध्यक्ष निवडणुकीला मोजून 309 मध्ये मिळाली. यावरून त्यांनी सावंतवाडीकर जनतेच्या नजरेत आपली पात्रता काय हे ओळखावे.
आम.दीपक केसरकरांवरील साळगावकर यांचे आरोप हे व्यक्ती द्वेष, स्वतःची न राहिलेली प्रतिष्ठा जपण्यासाठी आणि राजकीय पुनर्वसनासाठीचे प्रयत्न…!
“उद्धव ठाकरे यांच्याकडून आपण शिवबंधन बांधून घेणार नाही” अशी प्रतिज्ञा करणारे बबन साळगावकर आज त्यांचेच पुत्र आदित्य ठाकरे यांचे स्वागत करण्यासाठी आपल्या चार-पाच कार्यकर्त्यांसह ताटकळत नाक्यावर उभे राहतात हे कशाचे द्योतक आहे?
उभी हयात ज्या नाक्यावर घालवली तिथे आपल्या पाठीशी किती लोक आहेत? हे देखील त्यांनी दाखवून दिले आहे.
आम.दीपक भाई केसरकरांवर सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग मतदारसंघातील जनतेचे असलेले प्रेम, आशीर्वाद वारंवार मतपेटीतून दिसले आहे. त्यांची लोकप्रियता पाहूनच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केसरकरांना आमदारकीचे तिकीट दिले होते. राणे यांच्या दहशतवादाचा मुद्दा जनतेने उचलून धरला याची कल्पना शरद पवार यांनाही होती, असे असताना दीपक भाईंनी नारायण राणे यांचा प्रचार करावा ही यु.पी.ए. ची भूमिका दीपक भाई केसरकर यांना अमान्य होती. राष्ट्रवादीने अपमानीत केल्यानंतर त्यांना उद्धव ठाकरे यांनी जिमखाना मैदानावर हजारोंच्या संख्येने शिवबंधन बांधले ते केसरकरांची लोकप्रियता लक्षात घेऊनच…! मंत्रिपदाच्या काळात दीपक भाईंनी आजपर्यंत कोणालाही जमला नाही एवढा विकासनिधी आणला. मतदारसंघाच्या हितासाठी आपल्या भूमिका बदलल्याही असतील परंतु जनतेच्या हितालाच प्राधान्य दिले स्वहित कधीच पाहिले नाही.
मागील अडीच वर्षात दीपक भाईंकडे कर्तुत्व असूनही बाजूला टाकण्याचे प्रयत्न झाल्याने विकास ठप्प झाला, यातून मार्ग काढणे आवश्यक होते, त्यामुळे आम.केसरकरांनी मतदारसंघाच्या हितासाठी घेतलेला निर्णय मतदारांच्या कोर्टात आहे, आम.केसरकरांच्या विरोधात उभे राहून डिपॉझिट जप्त झालेल्या बबन साळगावकरांनी दीपक भाईंची काळजी करण्यापेक्षा राष्ट्रवादीतही कोणी विचारत नसल्याने आपल्या पुनर्वसनासाठी आता वेगळा पक्ष शोधावा. असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे माजी नगराध्यक्षा श्रीम.आनारोजीन लोबो, माजी उपनगराध्यक्ष श्री.राजन पोकळे, श्री.अशोक दळवी, माजी पंचायत समिती सदस्य, श्री.बाबू कुडतरकर माजी नगरसेवक, सौ.भारती मोरे माजी नगरसेविका, यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा