जनजागृतीच्या उद्देशाने वाहनांवर पोस्टर लावण्याचा उपक्रम
इचलकरंजी येथील प्रिंटर्स असोसिएशन इचलकरंजी या संघटनेच्या वतीने केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्वातंञ्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या उपक्रमाच्या जनजागृतीच्या उद्देशाने शहर वाहतूक नियंत्रण कक्ष परिसरात वाहनांवर पोस्टर लावण्याचा उपक्रम राबवण्यात आला.यावेळी शहर वाहतूक नियंत्रण कक्षाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने यंदाचे वर्ष अमृत महोत्सवी म्हणून साजरे करताना १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत देशातील प्रत्येक घरावर तिरंगा झेंडा लावण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.यासाठी जनजागृती होण्याच्या उद्देशाने प्रिंटर्स असोसिएशन इचलकरंजी या संघटनेच्या वतीने शहरातील प्रत्येक वाहनांवर पोस्टर लावण्याचा उपक्रम राबवण्यात आला.शहर वाहतूक नियंत्रण कक्ष परिसरात या उपक्रमाचा शुभारंभ शहर वाहतूक नियंत्रण कक्षाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ यांनी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सर्वांनी आपल्या घरावर तिरंगा झेंडा लावून देशाप्रती असलेली निष्ठा ,प्रेम व्यक्त करुन देशाचा ,समाजाचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प करुन तो सफल करुया ,असे नागरिकांना आवाहन केले.यावेळी प्रिंटर्स असोसिएशन इचलकरंजीचे अध्यक्ष महादेव साळी , उपाध्यक्ष सिताराम शिंदे यांनी प्रिंटर्स असोसिएशनच्या वतीने व्यावसायिक बंधूंची एकजूट करत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सामुहिकपणे प्रयत्न केला जातो.याशिवाय सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असल्याचे सांगून यंदाच्या वर्षी शासनाच्या वतीने स्वातंञ्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत देशातील प्रत्येक घरा – घरावर तिरंगा झेंडा लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे.तो संकल्प पूर्णत्वास आणण्यासाठी सर्व नागरिकांनी कर्तव्य भावनेतून आपल्या घरावर तिरंगा लावून देशाप्रती निष्ठा व प्रेम व्यक्त करावे ,असे आवाहन केले.यावेळी विविध मान्यवर ,रिक्षा चालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी इचलकरंजी प्रिंटर्स असोसिएशनचे सचिव संजय निकम , खजिनदार कलगौडा पाटील , सदस्य विनोद मद्यापगोळ ,दीपक वस्ञे , नरेंद्र हरवंदे , राकेश रुग्गे , स्वप्निल नायकवडे , गणेश वरुटे , सुधाकर बडवे ,दीपक फाटक , रणजित पाटील , सल्लागार दिनेश कुलकर्णी , शंकर हेरवाडे ,संतराम चौगुले ,संजय आगलावे यांनी अथक परिश्रम घेतले.