You are currently viewing बांदा केंद्र शाळेत श्रावण सोमवार निमित्ताने दुधाचे वाटप

बांदा केंद्र शाळेत श्रावण सोमवार निमित्ताने दुधाचे वाटप

बांदा

श्रावण महिन्याचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा बांदा नं. 1केंद्र शाळेत श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांना दुधाचे वाटप करण्यात येणार आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी इन्सुली नं 5 प्राथमिक शाळेचे शिक्षक हंसराज गवळे यांच्या वतीने सुमधुर मसाले दुधाचे वाटप 300 विद्यार्थ्यांना करण्यात आले .श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी बांदा येथील उद्योजक व पत्रकार विराज परब ,बांदेश्वर दुध संस्थेचे चेअरमन नारायण गावडे , उद्योजक सतिश पटेल यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना सुमधुर दुधाचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पहिल्या सोमवारी विद्यार्थ्यांना दुधाचे वाटप करतेवेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर ,पालक प्रशांत गवस, शाळा पोषण आहार स्वयंपाकी उमांगी मयेकर, रत्नमाला वीर ,दीक्षा ठाकूर, शुभांगी सावंत , मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.शालेय विद्यार्थ्यांना दुधासारख्या पूरक आहाराचे वाटप होत असल्याबद्दल पालक वर्गाकडून समाधान व्यक्त होत आहे .या उपक्रमासाठी योगदान दिलेल्या दात्यांचे शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आभार मानण्यात आले. याच दिवशी बांदा येथील सावित्री मेडिकल स्टोअर्स चे मालक विनायक दळवी यांनी शाळेसाठी प्रथमोपचार पेटी भेट दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा