You are currently viewing हिरवा श्रावण

हिरवा श्रावण

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच समूह प्रमुख लेखक कवी श्री.पांडुरंग कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना

ऊंच ऊंच त्या डोंगररांगा अडवीत राही ढग काळे
उंचावरूनी झेप घेतसी धबधब्याची पोरेबाळे

धुके सारखे झरझर पळते सवंगडी तो खट्याळ वारा
उधळीत आला सृष्टीवरती लावण्याचा अंगारा

जाई जुई निशिगंध मोगरा वृक्षलतिका वयात आल्या
झोंबाझोंबी करीता वारा सूर छेडीले तारा जुळल्या

मखमल गवताच्या गादीवर दरी टेकडी निजते सुंदर
वाकवाकुणी पहात राहि इंद्रधनुची कमान सुंदर

दिशादिशामधी कुठून दरवळे सुगंधमयही जणू कस्तुरी
घेऊनी का कुणी गुलाबदाणी सिंचन करिते दरीशिखरावरी

पांडुरंग कुलकर्णी

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − eight =