You are currently viewing देशाचा कणा

देशाचा कणा

उज्जैनकर फाऊंडेशन मुक्ताई नगर , जळगांव सभासद ‘ बुलढाणा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष तथा भाग्योदय लेखणी संच सदस्य मनोहर पवार यांची अप्रतिम काव्यरचना*

या देशाला
स्वातंत्र्य मिळाल्या पासून
तो जगतोय ….….
भिकाऱ्या गत
त्याची कंबर ही वाकलीय
कष्ट सोसून……

पण या देशाचा कणा
मात्र ताठ आहे…..
…. सरळ स्वाभिमानाने
म्हणुन देशाचा कणाच
तर….. वाकलाय ..

कित्येक आले गेले
जय जवान… … जय किसान ! . नारा
देवून गेले…. पण..
पोशिंद्याचे मात्र हाल हाल झाले.

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने
आम्ही लोक…..
अमृत महोत्सव साजरा करतोय…..
शेतकऱ्याला गहाण ठेवून

आझादी का महोत्सव
चित्र सारे आधुनिक ….
…. विकासाचे समृद्धीचे
पण….. कालच पेपरात
बातमी आली छापून… ……दोनशेहून
अन्नदात्यांनी केली…. .. आत्महत्या !

आम्ही ढोल ताशे डिजेवर
नाचतोय… करतोय या देशाचा… अमृतमहोत्सव साजरा !…….. त्यांच्या च
अंगणात…..
जखमेवर मिठ…….. चोळण्यासाठी .

मनोहर पवार
केळवदकर . जि . बुलढाणा .
मो .9850812651.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 2 =