You are currently viewing ▪कोकण विभागातील धनगर समाजाला विधान परिषद, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष पदी, जिल्हा नियोजन समिती सदस्य, जिल्हा परिषद पंचायत समितीवर संधी द्यावी…..

▪कोकण विभागातील धनगर समाजाला विधान परिषद, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष पदी, जिल्हा नियोजन समिती सदस्य, जिल्हा परिषद पंचायत समितीवर संधी द्यावी…..

अखिल धनगर समाज महासंघ महाराष्ट्र अध्यक्ष तथा कोकण धनगर समाज नेते भगवान शिंदे यांची मागणी….

*रत्नागिरी-*

१२ विधानपरिषदेच्या जागा रिक्त आहेत.या जागा राज्यपाल नियुक्त करतात. त्याचप्रमाणे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष पद रिक्त आहे, जिल्ह्या नियोजन समिती निमंत्रित सदस्य निवड देखील पालकमंत्री निवड झाल्यानंतर होणार आहे या ठिकाणी प्रस्थापित राज्यकर्त्यांनी कोकणातील धनगर समाजाला संधी द्यावी अशी मागणी अखिल धनगर समाज महासंघ महाराष्ट्र चे अध्यक्ष कोकण सुपुत्र भगवान शिंदे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकातून केली आहे. शिंदे पुढे आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हणतात कला, साहित्य, विज्ञान, सामाजिक, पत्रकारिता, अशा विविध क्षेत्रात कार्य केलेल्या व्यक्तींची या साठी शिफारस होते.
गेली 70 वर्षात कोकणातील धनगर समाजाला राजकिय व्यासपिठावर योग्य संधी अद्याप मिळालेली नाही. कोकणतातील धनगर कला, साहित्य, विज्ञान याच्या सहित सामाजिक कार्यांत राजकीय, शैक्षणिक पत्रकारिता अशा अनेक क्षेत्रात अग्रेसर आहे.मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र धनगर समाजाला विश्वासात घेऊन समाज कार्य करणा-या कोकणातील धनगर समाज नेतृत्वाला महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर, महामंडळावर जिल्हा नियोजन समिती सदस्य पदावर संधी मिळावी अशी आमची प्रमुख्यांनी प्रस्थापितांकडे मागणी आहे.गेले कित्येक वर्षे कोकणातील धनगर समाज विकासापासुन वंचीत आहे. सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर,ठाणे ह्या जिल्ह्यात धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. सह्याद्री पट्यातील द-या खो-यात, अतिदुर्गम भागात राहणा-या कोकण धनगर समाजाला अद्याप राजकिय क्षेत्रात कुठल्याच पक्षाकडुन संधी मिळालेली नाही, त्यामुळे कोकणातील धनगर समाज राजकिय दृष्ट्या मागे आहेच व विकासाच्या दृष्टीने विचार केला तर निधी अभावे कित्येक रस्त्यांची कामे प्रलंबीत आहेत, रस्ता कटींग झाला असेल तर खडीकरण नाही, खडिकरण झाले असेल तर डांबरीकरण नाही, रस्ता पुर्ण झाला असेल तर रस्त्यास ब्रीज नाही, पाणी प्रश्न विजेचा प्रश्न यांच्या सहिती अनेक अडचणींचा सामना या भागातील समाजाला वारंवार करावा लागत आहे. कोकणातील धनगर समाजाकडे समाजातील लक्ष देणारे नेतृत्व या विधान परिषद, महामंडळ, जिल्हा नियोजन समिती च्या माध्यमातुन कोकणाला मिळाले तर नक्कीच समाजाच्या विकासाच्या दृष्टीने फायदा होईल. म्हणुन कोकण भागातील धनगर समाजाला राजकीय व्यासपीठावर वर नक्की संधी मिळावी अशी कोकणवाशीय धनगर समाजाच्या वतिने आमची प्रस्थापितांन कडे मागणी आहे.
संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये दोन नंबरची लोकसंख्या असणाऱ्या धनगर समाजाची महाराष्ट्र राज्यात मोठी ताकद आहे. त्यात कोकण प्रांतामध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्य करतो. डोंगरदऱ्याखोऱ्यामध्ये वास्तव्यात असणाऱ्या धनगर समाजापर्यंत हवे तसे विकास कामे पोचलेली नाहीत. सध्या केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे आदरणीय केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांचे नेतृत्व केंद्रात तर त्यांचे सुपुत्र आदरणीय नितेशजी राणे हे राज्यात अतिशय चांगल्या प्रकारचे नेतृत्व करत कोकणातून भाजपला शक्ती देत आहे. सन्माननीय राणे साहेब यांचे अनेक निकटवर्तीय धनगर समाजातील बांधव आज त्यांच्यासोबत भाजपमध्ये सक्रियतेने काम करताना आम्ही सर्व पाहतोय. राणे साहेब व भाजपने जर मनात आणलं तर कोकणातील ही मागणी नक्कीच मान्य केली जाईल असा आम्हाला ठामपणे विश्वास आहे. याबाबत आम्ही श्री नारायण राणे साहेब यांची भेट घेऊन चर्चा करणार आहोत व योग्य समाज बांधवांना म्हणजे जो मूळ गावात ग्रामीण भागात तळागाळातल्या जनतेपर्यंत पोहोचणारा जनतेला सेवा देणारा, समाजासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या समाज बांधवांसाठी विधानपरिषद महामंडळ जिल्हा नियोजन समिती किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य नगरपंचायत नगरपरिषद महानगरपालिका अशा सर्व पदासाठी उमेदवारी मागणार आहोत. वेळ पडल्यास आवश्यक तो प्रस्ताव घेऊन उमेदवार देण्याचे देखील सहकार्य धनगर समाजाच्या वतीने आम्ही करू. आता ही मागणी मान्य झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आम्हाला आमचा माणूस राजकीय क्षेत्रात पुढे जाताना दिसला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सर्व एकत्र येऊन त्या व्यक्तीला सहकार्य करण्यासाठी देखील तयार आहोत. त्यामुळे राज्यातील प्रस्थापित राजकीय पक्षांनी पुढाकार घेऊन कोकणातील धनगर समाज बांधवांना न्याय द्यावा. जो पक्ष जो नेता कोकणातील धनगर समाजाला राजकीय प्रतिनिधित्व करण्याची संधी देईल त्या नेत्याच्या व पक्षाच्या पाठीमागे समस्त कोकणातील धनगर समाज सक्षमपणे उभा राहील असा आम्ही विश्वास व्यक्त करतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 4 =